मलेशिया एरलाइन्स
| ||||
स्थापना | १ ऑक्टोबर १९७२ | |||
---|---|---|---|---|
हब | क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | एन्रिच | |||
अलायन्स | वनवर्ल्ड | |||
विमान संख्या | ९४ | |||
मुख्यालय | सुलतान अब्दुल अझीझ शहा विमानतळ, सुबांग, मलेशिया | |||
संकेतस्थळ | http://www.malaysiaairlines.com |
मलेशिया एरलाइन्स (मलाय: Sistem Penerbangan Malaysia) ही मलेशिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९७२ साली स्थापन झालेल्या मलेशिया एरलाइन्सचे मुख्यालय क्वालालंपूर महानगरामधील सुलतान अब्दुल अझीझ शाह विमानतळावर असून क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तिचा मुख्य विमानतळ आहे.
सुरुवातीला मलेशिया एरलाइन्स मलेशियन एर लाइन सिस्टम बेरड (MAS) या नावाने ओळखली जात होती. या एरलाइन्सचे ब्रॅंडेड नाव मलेशिया एर लाइन होते. ही एरलाइन मुख्यतः क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आणि त्याच्या कोटा किनाबालू व कुचिंग या दुय्यम केंद्रातून पूर्ण एशिया, ओस्सानीय, यूरोप या खंडात विमान सेवा चालवते. ही विमान कंपनी मलेशियाची ध्वजवाहक व सर्व जगभरातील विमान कंपन्याशी संघटित आहे. यांचे मुख्य कार्यालय कौला लुंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.
मलेशिया एर लाइनच्या फायरफ्लाय आणि मासविंग्ज ह्या दोन सहकारी एर लाइन आहेत. त्यांची फायरफ्लाय एर लाइन पेनांग आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सुबांग विमानतळ पासून विमान सेवा देते. मासविंग्ज ही एर लाइन स्थानिक विमान सेवेवर लक्ष केन्द्रित करते. मलेशिया आये लाइन कडे युद्द सेवेचा विमान संच आहे तो क्संच मास विंग्जचे अखत्यारीत येतो आणि मालवाहातूक व प्रवाशी वाहतूक ही करते.
२०१४ साली झालेल्या मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ३७० व मलेशिया एरलाइन्स फ्लाइट १७ ह्या दोन मोठ्या विमान अपघातांमुळे मलेशिया एरलाइन्सच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला.
मलेशियन एविएशन इतिहास
सन १९३७ मध्ये जेव्हा वेयर्णे एर सेवा (WAS) सिंगापूर ते कौला लुंपूरव पेनांग चालू झाली तेव्हा मलाया येथे नियमित विमान प्रवाशी आणि टपाल सेवा सुरू झाल्या. वेयर्नेची विमान सेवा थियोडोर आणि चार्लस वेयर्नेस या ऑस्ट्रेलियन दोन बंधूंनी चालू केली.[१] आठवड्यातून सिंगापूर ते पेनांग अशी तीन विमान उड्डाणे यानुसार ही विमान सेवा चालू झाली. या सेवेसाठी दिनांक २८ जून १९३७ रोजी ड्रॅगन रॅपिड या ८ बैठकीचे हेविलंड DH.89A या विमानाचा वापर केला. हे पहिले उद्घाटनचे विमान सिंगापूर येथील त्याच वर्षी १२ जून रोजी चालू झालेल्या अगदी नव्या कोऱ्या कलॉंग विमान तळावरून उड्डाण केले. त्यानंतर D.H.89A या दुसऱ्या विमानाची त्यात भर करून दैनंदिन सेवा तसेच इपोह या ठिकाणीही विमान सेवा चालू केली. दुसऱ्या महायुद्दात जपानने मलाया आणि सिंगापूर या राष्ट्रांचा ताबा मिळवल्यानंतर ही (WAS) विमान सेवा बंद केली.
इतिहास
ही विमान सेवा मलायन एरवेझ लिमिटेड या नावाने सुरू झाली आणि सन १९४७ मध्ये तिने पहिले व्यावसायिक उड्डाण केले.[२] त्यांनतर कांही वर्षांनंतर सिंगापूरला स्वातंत्र्य मिळाले आणि १९७२ मध्ये या विमान कंपनीची संपत्ति विभागली गेली त्याने सिंगापूर झेंडा धारी सिंगापूर एर लाइन (MSA) आणि मलेशिया झेंडा धारी मलेशीयन एर लाइन सिस्टम (MAS)उदयास आली. त्यांचा लोगो म्हणजे मलेयशियन पतंगाचे आकाराचा “बाऊ बुलण” आहे.
देश व शहरे
ब्रॅंडिंग
सन २०१३ पासून ही एर लाइन “जर्निज आर मेड बाय पीपल यू ट्रव्हलं विथ” या स्लोगनचा वापर करू लागली. तरीसुद्दा विमान ३७० आणि १७ यांचे साठी “कीप फ्लाइंग,’ “फ्लाइंगहाय”, “बेटरटुमारो” या स्लोगनचा वापर केला. १ सप्टेंबर २०१५ रोजी जेव्हा या विमान कंपनीचे राष्ट्रीयकरण झाले तेव्हा “टूडेइजहिअर” या स्लोगनचा वापर केला.
सहभागीदारी करार
सन २०१५ अखेर या एर लाइन्स ने खालील विमान कंपन्याशी सहभागीदारी करार केलेले आहेत.
- एर मॉरीशस
- फायर फ्लाय
- कतार एरवेझ
- अमेरिकन एरलाइन्स [३]
- गरुडा इंडोनेशिया
- रॉयलं बृनेरी एर लाइन्स
- बँकॉक एरवेझ
- गल्फ एर
- रॉयलं जोरडर्नियन
- काथे पॅसिफिक
- जपान एर लाइन्स
- सिल्क एर
- चायना सौथर्ण एरलाइन्स
- जेट एरवेझ
- सिंगापूर एर लाइन्स
- ड्रॅगन एर
- के.एल.एम.
- श्रीलंकन एर लाइन्स
- इजिप्त एर
- कोरियन एर
- थाई एरवेझ इंटर नॅशनल
- एमिरेटस
- मास विंग्ज
- टर्किश एरलाइन्स
- एथिओपियन एरलाइन्स
- म्यानमार एरवेझ
- उजबेकीस्थान एरवेझ
- इतिहाद एरवेझ[४]
- ओमान एर
- क्षीयमेण एरलाइन्स
- फीन एर
- फिलिप्पिन एरलाइन्स
विमान संच
एप्रिल २०१६ अखेर या विमान कोमपेची ७६ विमाने प्रत्यक्ष उड्डाण सेवा करीत आहेत त्यात ५४ बोइंग आणि २२ एरबस आहेत आणि २० स्टोर मध्ये आहेत.[५] सर्व बोइंग ७७७ सेवेतून बाजूला केल्यानंतर सध्या जी सेवेत आहेत ती साधारण ३.७ वर्ष वयाची आहेत. या विमान कंपनीचा विमान चालविण्याचा प्रशिक्षण योजनेचे नाव एंरीच आहे. त्यामार्फत विविध विमाने चालविणे, बँकिंग , क्रेडिट कार्ड देणे, हॉटेल, किरकोळ कामकाज अशा प्रकारचे जगभर प्रोग्राम आखले जातात.
विमानांचा ताफा
विमान | वापरात | ऑर्डर | प्रवासी क्षमता | |||
---|---|---|---|---|---|---|
F | C | Y | एकूण | |||
एरबस ए-३३० | 15 | — | 0 | 36 | 247 | 283 |
एरबस ए-३८० | 5 | — | 8 | 66 | 420 | 494 |
बोईंग ७३७ | 15 | — | 0 | 16 | 150 | 166 |
41 | 14/10 | 0 | 16 | 144 | 160 | |
बोईंग ७४७ | 1 | — | 12 | 41 | 306 | 359 |
बोईंग ७७७ | 13 | — | 0 | 35 | 247 | 282 |
मालवाहू विमाने | ||||||
एरबस ए-३३० | 4 | — | नाही | |||
बोईंग ७४७ | 2 | — | नाही | |||
एकूण | 92 | 11/20 |
व्यवसाय
या विमान कंपनीचे ग्रुप मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अहमद जौहरी याहया यांनी २८ फेब्रुवरी २०१३ रोजी या विमान कंपनीला RM५१.४ मिल्लियन निव्वळ नफा चौथ्या त्रैमाशिकचे शेवटी झाला त्यात गत वर्षातिल तोटा RM१.३ बिल्लियन भरून काढलेला आहे असा रीपोर्ट दिला.
पुरस्कार
सन २०१०,२०११,२०१२,२०१३ मध्ये विमान संघांकडून या विमान कंपनीला बरेच पुरस्कार मिळाले.[६]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "मलेशिया एयरलाइन्सचे संस्थापक" (PDF). 2011-07-18 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-06-10 रोजी पाहिले.
- ^ "मलेशिया एरलाइन्स विषयी".
- ^ "अमेरिकन एरलाइन्स आणि मलेशिया एरलाइन्स यांच्यात नवीन कोडशेअर करार".
- ^ "मलेशिया एयरलाइन्स आणि इतिहाद एयरवेज यांच्यात कोडशेयर भागीदारी".
- ^ "विमान संच माहिती - मलेशिया एरलाइन्स". 2016-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-10 रोजी पाहिले.
- ^ "मलेशिया एयरलाइन्सचे पुरस्कार".