मलेशिया
मलेशिया Malaysia | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: Bersekutu Bertambah Mutu (एकी हेच बळ) | |||||
राष्ट्रगीत: नगाराकू (माझा देश) | |||||
मलेशियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | पुत्रजय, क्वालालंपूर | ||||
सर्वात मोठे शहर | क्वालालंपूर | ||||
अधिकृत भाषा | मलाय | ||||
सरकार | संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही | ||||
- राष्ट्रप्रमुख | अब्दुल हलीम | ||||
- पंतप्रधान | नजीब रझाक | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | ऑगस्ट ३१, इ.स. १९५७ (युनायटेड किंग्डमपासून) सप्टेंबर १६, इ.स. १९६३(सबा, सारावाक, सिंगापूर यांसमवेतच्या संघराज्यापासून) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ३२९,८५४ किमी२ (६७वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ०.३ | ||||
लोकसंख्या | |||||
- २००९ | २,८३,१०,००० (४३वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}} {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ८५.८/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ३५७.९ अब्ज अमेरिकन डॉलर (२९वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | १४,४०० अमेरिकन डॉलर (५७वा क्रमांक) | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.८२९[१] (उच्च) (६६ वा) (२००७) | ||||
राष्ट्रीय चलन | मलेशियन रिंगिट (MYR) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मलेशियन प्रमाणवेळ (MST) (यूटीसी+०८:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | MY | ||||
आंतरजाल प्रत्यय | .my | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ६० | ||||
मलेशिया हा तेरा राज्ये आणि तीन संघराज्यीय प्रदेशांनी बनलेला आग्नेय आशियामधील एक देश आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर असून पुत्रजय येथे संघराज्य शासनाचे मुख्य केंद्र आहे. ३,२९,८४७ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचा विस्तार असलेल्या या देशाचे दक्षिण चिनी समुद्राने विभागलेले द्वीपकल्पीय मलेशिया आणि मलेशियन बोर्निओ हे प्रमुख दोन भाग आहेत. थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, ब्रुनेई आणि फिलिपाइन्स या देशांना लागून मलेशियाच्या सीमा आहेत. हा देश विषुववृत्ताजवळ वसलेला असल्यामुळे येथील हवामान विषुववृत्तीय हवामानप्रकारानुसार आहे. मलेशियामध्ये वेस्टमिन्स्टर धर्तीवरील संसदीय लोकशाही असून सत्तेच्या सर्वोच्चपदी यांग दी-पेर्तुआन आगोंग (राजा) व कार्यकारी प्रमुखपदी पंतप्रधान असतात.
धर्म
मलेशिया हा मुस्लिम बहुसंख्य (६३%) देश आहे, तसेच येथे इस्लामला देशाचा अधिकृत धर्म म्हणून मान्यता मिळालेली आहे. परंतु सहिष्णुता धोरणानुसार येथे बौद्ध विहार, चर्च, हिंदू मंदिर असण्याबाबतची परवानगी आहे.
- धर्म
भूगोल
जमिनीच्या क्षेत्रफळानुसार ३,२९,८४७ वर्ग कि.मी. क्षेत्रपफळाचा मलेशिया जगात ६६ व्या क्रमांकाचा मोठा देश असून २.८ कोटी लोकसंख्येसह जगात ४३ व्या क्रमांकावर आहे. याच्या पश्चिमेस थायलंड, पूर्वेस इंडोनेशिया व ब्रुनेई हे देश असून दक्षिणेस जोहोर सामुद्रधुनीवरील पुलाने जोडला गेलेला सिंगापूर आहे. व्हिएतनाम व फिलिपिन्स या देशांशी मलेशियाच्या सागरी हद्दी भिडल्या आहेत.
राजकीय विभाग
मलेशियात १३ राज्ये व ३ संघशासित प्रदेश आहेत.
मोठी शहरे
मलेशिया
उद्योग येथे रबरापासून विविध वस्तू बनवणे, हा एक महत्त्वाचा उद्योग आहे. मासे वाळवणे, ते हवाबंद डब्यात भरणे; नारळ व ताडफळापासून तेल काढणे; वेत व बाबू यांपा सून विविध वस्तू तयार करणे; लाकडापासून फळ्या ओडके, फर्निचर बनवणे; कापड विणणे इत्यादी विविध प्रकारचे उद्योग या देशात आहेत. येथे खनिज तेलावर आधारित व्यवसाय वाढत आहे. मलेशियात लाकूड व कोळसा ही पारपारिक ऊर्जा साधने वापरात आहेत. त्याचप्रमाणे नसर्गिक वयुचाही ऊर्जा म्हणून उपयोग केला जातो. वर्षभर भरपूर पाऊस असल्यामुळे अलीकडे येथे जलविदयुत निर्मिती प्रकल्प उभारले गेले आहेत. व्यापार मलेशियाचा व्यापार प्रमुख्याने जपान , अमेरिकेची संयुक्त संस्थाने , सिगापूर, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स,भारत, थायलंड, रशिया या देशाशी चालतो. मलेशिया अन्नधान्य, साखर, रसायने,लोह आणि पोलाद, कापड इत्यादी आयात करतो. रबराच्या वस्तू लाकूड व लाकडाच्या वस्तू , कथील, नारळ, पामतेल, अननस, विजेवर चालणारी उपकरणे, खनिज तेल इत्यादी वस्तू हा देश निर्यात करतो. वाहतूकः मलेशियाचा बहुतेक भाग डोगराळ असल्यामुळे वाहतूकीच्या साधनाचा फारसा विकास होऊ शकला नाही. पण अलीकडे या डोगररांगामधून रस्ते व लोहमार्ग बांधन्यात आले आहेत. व्यवसाय शेती: मलेशिया हा शेतीप्रधान देश आहे. उष्ण व दमट हवामान, भरपुर पाऊस या अनुकूल परिस्थितीमुळे येथे विस्तीर्ण शेत्रावर भातशेती करतात. नारळ व तडफळे यांचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. पामतेलाच्या नीर्या तीत हा देश आग्रासर आहे. डोंगर उतारावर मळे आहेत. याशिवाय मिरी, लवग इत्यादी मसाल्याच्या पदार्थांचेही उत्पादन येथे होते. मासेमारी: मलेशिया देशाच्या दोन्ही भागांना लांब समुद्रकिनारा लाभला आहे . त्यामुळे मासेमारी हा येथील महत्त्वाचा व्यवसाय आहे. सागरी मासेमारीबरोबरच मलेशियातील नद्या , कालवे, सरोवर इत्यादी ठिकाणीही मासेमारी उद्योग चालतो. बीलीस, देहाल इत्यादी माशाचे प्रकार मिळतात. खाणकाम: या देशात सोने , कथिल, लोह, तांबे , इत्यादी धातू खनिजे, तसेच खनिज तेलाचे साठे आहेत. व्यापारीदष्ट्या या खनिजाना खूप महत्त्व आहे. कठलाच्या उत्पादनात मलेशिया अग्रेसर आहे. वाहतूकः मलेशियाचा बहुतेक भाग डोंगराळ असल्यामुळे वाहुतुकीच्या साधनांचा फारसा विकास होऊ शकला नाही . पण अलीकडे या डोंगररांगांमधून रस्ते व लोहमार्ग बाधण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक होऊ लागली आहे. लांब किनाऱ्यामुळे जलमार्ग विकसित झाले आहेत. केलाग, मेलका ही या देशातील प्रमुख बंदरे आहेत. उद्योग: येथे राबरापासून विविध वस्तू बनवणे, हा एक महत्त्वाचा उद्योग आहे. मासे वाळवणे, हवाबंद डब्यांत भरणे; नारळ व ताडफळापसून तेल काढणे; वेत व बांबू यापासून विविध वस्तू तयार करणे; ओड्के , फर्निचर बनवणे; कापड विणणे इत्यादी विविध प्रकारचे उद्योग या देशात आहेत . येथे खनिज तेलावर आधारित व्यवसाय वाढत आहे. मलेशियात लाकूड व कोळसा ही परपारिक ऊर्जा साधने म्हणून उपयोग केला जातो . वर्षभर भरपूर पाऊस असल्यामुळे अलीकडे येथे जलविदुयत निर्मिती प्रकल्प उभारले गेले आहेत. वनस्पती: या देशात विषववृतिय सदाहरित वने आढळतात. यात प्रामख्याने ओक, एबनी, महोगणी, साग, रबर इत्यादी वृक्ष आढळतात. किनारपटटीला खरपुटी वनस्पतीचे विविध प्रकार आढळतात.
संदर्भ
- ^ "मानवी विकास अहवाल - २००९. मानवी विकास निर्देशांकाचे कल : सारणी 'ग'" (PDF) (इंग्लिश भाषेत). ५ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
- अधिकृत शासकीय संकेतस्थळ (भासा मलायू व इंग्लिश मजकूर)
- पंतप्रधान कार्यालयाचे संकेतस्थळ (भासा मलायू व इंग्लिश मजकूर)
- विकिव्हॉयेज वरील मलेशिया पर्यटन गाईड (इंग्रजी)