मलेरिया लस
मलेरिया हा आजार आफ्रिकेत व आशिया खंडात जास्त प्रमाणात आढळून येणार आजार आहे. हा आजार डासांमुळे पसरत असतो. बऱ्याच दिवसापासून या आजारावरील लसीचे निर्माण चालू होते व आता जागतिक आरोग्य संघटनेने लॅक्झोस्मिथक्लीन कंपनीच्या मॉसक्विरीझ या लसीला मान्यता दिलेली आहे. मलेरियाची लस सहा आठवडे ते १७ महिने वयातील मुलांसाठी तयार करण्यात आलेली आहे. मलेरिया लसचे ४ डोस देण्यात येतात. पहिले डोस सहा आठवड्याला, दुसरा डोस दहाव्या आठवड्याला, तिसरा डोस १४ आठवड्याला देण्यात येतो व शेवटचा डोस १८ व्या महिन्याला देण्यात येतो.या लसीमुळे काही वेळेस लहान मुलाला ताप येत असतो परंतु तो औषध दिल्याने कमी होतो. [१]
संदर्भ
- ^ "WHO recommends groundbreaking malaria vaccine for children at risk". www.who.int (इंग्रजी भाषेत). 2022-03-08 रोजी पाहिले.