Jump to content

मराठ्यांच्या तलवारी

शस्त्र आणि शास्त्र या विषयावर अभ्यास करताना विशेष अभ्यासत असलेला विषय म्हणजे मराठा धोप म्हणजेच मराठा तलवार मुळ शब्द तरवार शिवाजी महाराज हा विषय म्हणजे एक विद्यापीठ आहे त्यातील एक पान म्हणजे मराठ्यांची शस्त्र यात प्रामुख्याने मराठ्यांच्या तलवारींचा उल्लेख येतो. तलवारी बाबत तरवार हा शुद्ध शब्द आहे.तर तलवारी ह्या इस्लामिक,फ़िरंगी व मराठे या वेगवेगळ्या विभागाप्रमाणे वेगवेगळ्या आढळतात, त्याच प्रमाणे पुराणातील तलवारी वेगळ्या दिसतात काळानुसार या शस्त्रात बदल होत गेले सैन्याकडे असलेल्या तरवारी व सेनापती राजे यांच्या तलवारी वेगळ्या असत तलवारीचे पान असे ही म्हणतात तसे पान म्हणजे पाते तलवारींची किंमत ही पात्यावरून ठरत असे भारतीय बनावटीचे पोलाद व फिरंगी म्हणजेच परदेशी पाते यात खुप बदल होता फिरंगी पोलाद हे कठीण लवचीक व वजनाला हलके छत्रपती शिवरायांच्या तीन तलवारी प्रचलित आहेत त्यातील एक तुळजा तलवार जी शहाजी राजे यांनी १६६२ साली शिवाजी महाराजांना दिली होती ती कर्नाटक वरून आणल्यामुळे तिला कर्नाटकी धोप म्हणतात दुसरी भवानी_तरवार : भवानी तलवार - शिवछत्रपतींनी वापरलेल्या अनेक तलवारींपैकी ही एक तलवार आहे “परमानंद नेवासकर कृत शिवभारत मध्ये "मी तुझ्या तलवारीमध्ये आशीर्वाद बनून राहीन." अश्या अर्थाचा श्लोक होता, त्याचे नंतर भवानी आईने तलवार दिली असे रूपांतर झाले.भवानी तलवारीचा उगम - इ.स.१५१० साली अल्फोन्सो आल्बुकर्क याने गोवा जिंकला .त्याचा सेनापती डियागो फर्नांडीस याने लगेचच सावंतवाडी वर हल्ला केला,पण हल्ला सपशेल फसला आणि पोर्तुगिजांचा दारुण पराभव खेमसावंत राजेभोसल्यांनी केला.त्यावेळी ही पोर्तुगीजांची तलवार मिळाली छत्रपतींना ही तलवार १६५९ साली भेट म्हणून देण्यात आली या तलवारीचे निरीक्षण केले असता cavlery sword म्हणजेच घोडदळात वापरण्यात येणारी तलवार ह्या तलवारीला पाहताच महाराजांची दूरदृष्टी व तल्लख बुद्धीमत्तेला चालना मिळाली अशी तलवार जर आपल्या सैन्य दलाकडे असेल तर आपले लोक गनिमांवर जरब बसवतील याच कारणे हा भवानी मातेचा आशिर्वाद म्हणून ही तलवार त्या काळी महाराजांनी मुल्य देऊन घेतली. तर ही भवानी तलवार रायगड पडला तेव्हा झुल्फिकार खानच्या हातात पडली असावी.त्याचवेळी छत्रपती शाहू महाराज(प्रथम),येसूबाई महाराणीसाहेब व इतर लोक कैद झाले.औरंगजेबाने येसूबाई आणि शाहू महाराजांची विशेष बडदास्त ठेवली येसूबाई यांना स्वतःचा शिक्का व चरितार्थासाठी काही वतने दिली,तसेच शाहूंना "सरकार राजा शाहू " अशी पदवी दिली. नंतरच्या काळात शाहू महाराज मोठे झाल्यावर औरंगजेबाने त्यांचे धर्मांतर करण्याचे ठरविले परंतु शाहू आणि येसूबाई राणी साहेबांनी त्यास विरोध दर्शविला त्यामुळे औरंगजेबाने तो विचार सोडून दिला आणि शाहूंचे लग्न बहादुरशहाच्या मुलीशी लावले त्या लग्नप्रसंगी औरंगजेबाने भवानी तलवार, अफझलखानाची तलवार आणि काही रत्ने शाहूंना भेट दिली.नंतर हीच तलवार शाहू महाराजांबरोबर साताऱ्यात आली,तीच तलवार सातारा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर महालामध्ये आहे.त्यावर "सरकार राजा शाहू" असे कोरले आहे. या भवानी तलवारीला प्रभाव महाराजांवर येवढा पडला की वजनाने हलक्या, वेगवान, लांब व सरळ अशा भवानी तलवारीने प्रभावित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना त्याच प्रकारच्या तलवारी उपलब्ध करून सक्षम करण्याचा निर्णय घेतला. म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय निविदा काढली कारण त्या काळात युरोपियन राष्ट्रांमध्ये अशा चांगल्या प्रतीच्या तलवारी तयार होत होत्या. ब्रिटिश, डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इतर युरोपियन शक्तींना अश्या तलवारी विक्रीस उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले. एक महान लढवय्या राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानतेबद्दल बहुतेक प्रत्येक युरोपीय सामर्थ्याने परिचित होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्यांची महत्त्वाकांक्षा धोक्यात येईल असे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी आदेश स्वीकारण्यास नकार दिला. परंतु फ्रान्स आणि पोर्तुगाल यांच्या मध्ये एक युरोपियन राष्ट्र होते जे आर्थिकदृष्ट्या फारसे मजबूत नव्हते त्यांनी ह्या तलवारी पुरवण्यास मान्य केले. हे लहान राष्ट्र म्हणजे स्पेन होय. स्पेनच्या प्रमुखांनी ती आज्ञा मान्य केली आणि हजारो युरोपियन तलवारीचे पाते भारतासाठी रवाना होऊ लागले. महाराजांना प्रभावित होऊन तसेच बळकट युरोपीय सामर्थ्याच्या पुढे स्पेन सारख्या लहान देशावर विश्वास ठेवून हे मोठे काम दिले हे बघून स्पेनच्या प्रमुखांनी शिवाजी महाराजांना एक तेजस्वी, मढवलेली अप्रतिम तलवार भेट दिली. या तलवारीच्या पात्यावर I H S म्हणजेच imperial heritage of spen ( स्पेनचा शाहीवारसा) असे कोरले आहे हीच ती जगदंबा तलवार होती. या बाबत संदर्भ:

तलवारी संबंधीची करवीर संस्थानातील नोंद -

पंतप्रधान कदम सरकार करवीर, शस्त्रागार तर्फे रावबहादूर दादासो सुर्वे

नोंदणी जीनस - जगदंबा तलवार

जिनसाचे नाव | डाग आकार सहित | तपशील दास्तान | चालूकडे

तलवार सडक | १९७-११ | १९७-११ | हल्ली नाही

जगदंबा मेणावर

तपशील - नाकीत्यास हिरे ६,माणके ४४ ,पाचा १०

एकूण पराज हिरे १३,पाचा १८ , माणके ४६७

मिळून सबंध तलवार.

हीच तलवार सध्या लंडन मध्ये आहे असा दाव केला जातोय या तलवारीचे वर्णन लंडन मधील Royal Collection Trust ने इसवी सन १८७६ साली तयार केलेल्या कॅटलाॅग मध्ये ही तलवार एकधारी असुन तीची लांबी ३९ इंच येवढी आहे असे केले आहे . तलवारींची पाती ही बाहेरून येत असली तरी मुठी या स्वराज्यातच मुल्हेर गडावर होत असे त्यामुळे या मुठींना मुल्हेर असे नाव पडले . या संबंध तलवारीला धोप किंवा फिरंग म्हणतात या तलवारी आपल्याला सर्व साधारण सरदार व मावळ्यांकडे आढळत नाहीत तर महाराजांच्या खास मर्जीतीलच सरदारांकडे या तलवारी व पोशाख स्वतः महाराज बहाल करीत इतर मराठा सैन्याकडे वक्र मराठा तलवार असे व मुठीवर परज म्हणजेच लढाईत कैंची झाल्या नंतर बोटे कापली जावू नये म्हणून safety Handel असलेली तलवार वापरात होती अस्सल धोप ही पराक्रमी सरदारांकडेच पाहीली जाते अशा धोप तलवारी शौर्य व वारसा याचे प्रतीक आहे यांची हूबेहूब प्रतिकृती बाजारात उपलब्ध आहे परंतु शेवटी जुनं तेच सोनं

छत्रपती शिवराय असे शक्ती दाता..।