मराठे गारदी
मराठे गारदी ही १७५० च्या दशकातील मराठ्यांची महत्त्वाची लष्करी कमान होती. यातील सैनिक तोफखाना चालवण्यात तसेच बंदूक चालवण्यात पटाईत होते. इब्राहिम खान गारदी कडे या कमानीचे नेतृत्व होते. गारदी त्याकाळचे देशी मस्केटीयर्स होते. त्यांची तुलना रोमच्या प्रेटोरियन रक्षकांशीही केली जाते.