Jump to content

मराठी संशोधन मंडळ, मुंबई (१९४८)

मराठी संशोधन मंडळ, मुंबई ही चिंतामण द्वारकानाथ देशमुख आणि अनंत काकबा प्रियोळकर यांच्या प्रेरणेने व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या पुढाकाराने, १ फेब्रुवारी १९४८ रोजी स्थापन झालेली संस्था आहे.[][]

स्थापना

१९४६ साली बाळशास्त्री जांभेकर यांच्या शतसांवत्सरिक पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रा. प्रियोळकरांनी मराठी संशोधन मंडळाची कल्पना मांडली. त्यावेळचे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी सरकारी साहाय्याचे आश्वासन दिल्यानंतर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने पुढाकार घेतला आणि संशोधन कार्यासाठी पुढे पाऊल टाकले.[] भा. वि. वरेरकर, अनंत हरी गद्रे, अनंत काकबा प्रियोळकर, वा. वि. भट आणि दि. पु. धुपकर यांचे शिष्टमंडळ बाळासाहेब खेरांना भेटले आणि १ फेब्रुवारी १९४८ रोजी संग्रहालयाने ‘मराठी संशोधन मंडळ’ स्थापन केले.[][]

संशोधन

प्रकाशन

मराठी संशोधन पत्रिका

अनुदान

साहित्य संस्कृती मंडळामार्फत 'मराठी संशोधन पत्रिके'साठी मराठी संशोधन मंडळास महाराष्ट्र शासनाचे अनुदान मिळते. त्याशिवाय मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे काही अनुदानही संस्थेस प्राप्त होते.

मराठी संशोधन मंडळाचे संचालक

अनुक्रम वर्ष वर्ष
प्रा. कृ. पां. कुलकर्णी
प्रा. अ. का. प्रियोळकर
डॉ. स. ग. मालशे
प्रा. रा. भि. जोशी
प्रा. म. वा. धोंड
प्रा. सुरेंद्र गावसकर
प्रा. रमेश तेंडुलकर
प्रा. वसंत दावतर
डॉ. दत्ता पवार
सध्याचे डॉ. प्रदीप कर्णिक

संदर्भ

  1. ^ a b c चंद्रकांत भोंजाळ लिखित दैनिक प्रहार January 31, 2016 04:00:47 AM मधील नाही-चिरा-नाही-पणती[permanent dead link] लेख दिनांक २७/२/१०१७ रोजी जसा अभ्यासला
  2. ^ a b [http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5hMuCLMe-fkJ:m.dailyhunt.in/news/india/marathi/saamana-epaper-saam/marathi%2Bsanshodhan%2Bmandalachi%2Bdin%2Bavastha-newsid-50201803+&cd=11&hl=en&ct=clnk&gl=in&client=firefox-b 'मराठी' संशोधन मंडळाची 'दीन' अवस्था दैनिक सामना लेख Saturday, 27 Feb, 12.00 pm]