Jump to content

मराठी शुद्धलेखन/स्र आणि स्त्र

स्र=स्‌+र. आणि स्त्र=स्‌+त्‌+र. लिहिताना ’स्र’ कुठे लिहायचा आणि ’स्त्र’ कुठे हे नेमके आठवत नाही. त्यासाठी ही अक्षरे असलेल्या शब्दांची ही यादी :

स्र असलेले शब्द

अजस्र, ओस्राम (=विद्युत्पादने बनविणारी एक कंपनी), चतुरस्र, भस्रिका, मिस्र(=मिसर, इजिप्त), सहस्र, सहस्रधारा (धबधबा), सहस्रबुद्धे, सहस्राक्ष (इंद्र), स्रग्धरा (मराठीतील एक काव्यवृत्त), स्रवणे, स्रष्टा(=निर्माता, ब्रह्मदेव), स्राव, स्रुचा व स्रुवा (यज्ञात वापरल्या जाणाऱ्या पळ्या), स्रोत, हिंस्र, वगैरे.

स्त्र असलेले शब्द

हे अनेक आहेत. ’अस्त्र’ आणि शास्त्र या शब्दांत ’स्त्र’ असल्याने अनेक शब्द बनतात .उदा०

अस्त्र, इस्त्री(इस्तरी), ब्रह्मास्त्र, मिस्त्री(मिस्तरी), वरुणास्त्र, वस्त्र, शस्त्र, शस्त्रास्त्र, शास्त्र, शास्त्रज्ञ, शास्त्री, सशास्त्र, स्त्री, स्त्रैण, वगैरे.

सृ असलेले काही शब्द

सृृजन, सृष्टी,