मराठी वाक्प्रचार
शब्दसमूहांचा मराठी भाषेत वाक्यात वापर करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार अथवा भाषेतील संप्रदाय असे म्हणतात.
- अग्निदिव्य करणे.
- अर्थ : कठीण कसोटीला उतरणे.
- अटकेपार झेंडा लावणे.
- अर्थ : फार मोठा पराक्रम गाजवणे.
- अठरा विश्वे दारिद्र्य असणे.
- अर्थ : पराकोटीचे दारिद्र्य असणे.
- सर्वस्व पणाला लावणे.
- अर्थ : सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे.
- साखर पेरणे.
- अर्थ : गोड गोड बोलून आपलेसे करणे.
- सामोरे जाणे.
- अर्थ : निधड्या छातीने संकटास तोंड देणे.
मराठी संप्रदायांचा संग्रह असलेली पुस्तके
- मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी (वि.वा. भिडे)
- मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी (वा.गो. आपटे)
- भारतीय कहावत संग्रह (तीन खंड) (संपादक - विश्वनाथ दिनकर नरवणे)