Jump to content

मराठी लेखन मार्गदर्शिका (पुस्तक)

मराठी लेखन मार्गदर्शिका
लेखकयास्मिन शेख
भाषामराठी
साहित्य प्रकारभाषा
प्रकाशन संस्थामराठी राज्य विकास संस्था प्रकाशन
प्रथमावृत्ती१९९७
चालू आवृत्ती
पृष्ठसंख्या८०

मराठी लेखन मार्गदर्शिका हे मराठी भाषेत अचूक लिखाण करता यावे या कारणासाठी तयार झालेले पुस्तक आहे. सर्वसामान्य नागरिक आणि शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी यांना त्याचा उपयोग आहे. तसेच मराठी भाषा शिकणाऱ्या अन्य भाषक व्यक्ती, दूरचित्रवाणीपटावर लेखन करणारे कलावंत, पाट्या रंगविणारे रंगारी, टंक लेखक, संगणकावर अक्षरजुळणी करणारे, आंतरजालावर लेखन करणारे अशा सर्वांना मराठीत लेखन करण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग आहे. [ संदर्भ हवा ]

मराठी भाषेत महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींचा समावेश या पुस्तकात आहे.

या पुस्तकाची प्रथम आवृत्ती जून इ.स. १९९७ साली प्रसिद्ध झाली. या पुस्तकात १८२ पाने आहेत. तसेच इ.स. २०११ साली त्याचे मूल्य ८० रुपये होते. हे पुस्तक राज्य मराठी विकास संस्था यांनी प्रकाशित केले आहे.

उपलब्धता

हे पुस्तक राज्य मराठी विकास संस्था तसेच सर्व पुस्तक विक्रेते आणि आंतरजालावर रसिक साहित्य येथे उपलब्ध आहे.

हेही पाहा