Jump to content

मराठी ख्रिश्चन

मराठी ख्रिश्चन किंवा मराठी ख्रिस्ती हा ख्रिश्चन धर्म आचरणारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषिक समूह आहे. महाराष्ट्रात ख्रिस्ती हे प्रामुख्याने दोन गटात आढळतात - पहिले ईस्ट इंडियन ख्रिश्चन, जे मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांमधले मूलनिवासी आहेत; व दुसरे हिंदूधर्मातून धर्मांतरित झालेले, प्रामुख्याने अहमदनगर, सोलापूर, पुणे  नाशिक आणि औरंगाबाद येथील, ,"मराठी ख्रिस्ती " म्हणून ओळखले जातात.  २०११ च्या भारतीय जनगणनेच्य अहवालानुसार, महाराष्ट्रात ख्रिस्तींची लोकसंख्या ०.९६% (सुमारे १%) आहे

इंग्रजाच्या काळात १८व्या शतकात काही लोकांनी मिशनरिचा कार्याने प्रभावित होऊन धर्मांतर केले, त्यात मधल्या जातीच्या लोकाबरोबर काही ब्राह्मण कुटुंबांनीही धर्मपरिवर्तन केले. त्यात ना. वा. टिळक. पंडिता रमाबाई आणि रामकृष्ण मोडक होते.  ह्या ब्राह्मणांचा ख्रिस्ती समाजावर खूपच प्रभाव  पडला,ना वा टिळकांनी लीहलेली गीते आणि भजने चर्च मध्ये भक्तिगीते म्हणून आज ही गायले जातात.

ब्रिटिश मिशनरी विल्यम क्यारे ह्यांचं मराठी साहित्यातले योगदान नावाजले जाते, त्यांनी पाहिले मराठी बायबल १८२० मध्ये लिहले आणि त्यासाठी त्यांनी मराठी व्याकरण प्रमाणित केले, ब्रिटिश मिशनिरिनी इंग्रजी–मराठी शब्दकोशची निर्मिती केली आणि मराठी साहित्याला पश्चिमी साहित्याशी पहील्यादा परिचित केले.

हिंदू, इस्लाम, बौद्ध व जैन धर्मांनंतर ख्रिश्चन हा महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे.[]

प्रथा

रोमन कॅथलिक पंथीयांची संख्या महाराष्ट्रात अधिक असून, जे मराठी ख्रिश्चन प्रोटेस्टंट पंथाचे अनुयायी आहेत ते नाशिक, अहमदनगर, सोलापूर येथे लक्षणीय संख्येत आढळतात. अहमदनगरात पहिले चर्च पाथर्डी तालुक्यातले मिरी येथे इंग्रजांनी इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकात बांधले होते. अहमदनगरात सर्व जातीच्या ख्रिस्ती लोकांची स्वतंत्र चर्चेस आहेत. अहमदनगरातले, सोलापुरातले बहुतेक ख्रिस्ती हे १८०० शतकातअमेरिकन मराठी मिशनमिशन ऑफ द चर्च ऑफ इंग्लड यांच्या धर्मप्रचारणे प्रेरित झालेले आहेत, महाराष्ठ्रातले बहुतेक प्रोटेस्टंट हे चर्च ऑफ नॉर्थ इंडिया ह्या संप्रदायातले आहेत.

श्रद्धा

हरेगाव ह्या श्रीरामपूर तालुकयातील गावी मतमाउलीची जत्रा दरवर्षी भरते. लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू या जत्रेसाठी येतात. ही जत्रा दरवर्षी ७ आणि ८ सप्टेंबरास असते. हरीगावाला मराठी कॅथलिकांचे पंढरपूर अशी उपमा दिली जाते. या जत्रेला औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रातील लोक येतात. काही लोक तेथे नवस करायला येतात आणि त्यांचे पूर्णही होतात, अशी श्रद्धा आहे. ही जत्रा मतमाउलीच्या जन्मदिवसाच्या वेळी असते. ही जत्रा जे लोक वांद्रे येथील माऊंट मेरीच्या जत्रेला जाऊ शकत नव्हते. त्यांच्या सोयीसाठी ही जत्रा एका ख्रिस्ती धर्मगुरूने इ.स. १९४९ साली सुरू केली.

मराठी ख्रिस्ती संमेलने

सन १९२७ सालापासून दरवर्षी नित्यनेमाने मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरते.

नियतकालिक

ख्रिस्ती समाजाचे ज्ञानोदय नावाचे नियतकालिक इसवी सन १८४२ च्या जून महिन्यापासून अहमदनगर येथून प्रसिद्ध होत आले आहे.

फ्द्फे

इतिहास

  1. ^ भारतातीय राज्यातील धर्मनिहाय जनगनणा