मराठी ई-साहित्य संमेलन
युनिक फीचर्स या संस्थेतर्फे मराठी ई-साहित्य संमेलन भरते. हे ई-संमेलन असल्याने ते आंतरजालावरच असते, कुठल्याही शहरात नाही. याउलट, नेटकऱ्यांचे ई-साहित्य संमेलन हे आंतरजालावर लिखाण करणाऱ्या लेखक-कवींचे असते. ते अर्थातच कुठल्यातरी शहरात भरवावे लागते.
www.uniquefeatures.in या आंतरजालावरील ठिकाणी पहिले मराठी ई-साहित्य संमेलन ३१ डिसेंबर २०१० ते २ जानेवारी २०११ या दिवशी आयोजित केले गेले. त्या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध मराठी लेखक रत्नाकर मतकरी होते.
या प्रकारचे दुसरे संमेलन २८ जानेवारी २०१२ला झाले, संमेलनाध्यक्ष कवी ग्रेस होते.
बाह्यदुवे
- "मराठी ई-साहित्य संमेलन". 2014-03-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-15 रोजी पाहिले.
पहा :मराठी साहित्य संमेलने