Jump to content

मराठीत सॉफ्टवेरचे भाषांतर

मराठीत सॉफ़्टवेअरचे भाषांतर करताना खालिल बाबी लक्षात घ्यावा :
१)जर तुम्हाला एखाद्या सॉफ़्टवेअरचे भाषांतर करायचे असेल , तर तुम्ही मुक्त सॉफ़्टवेअर (OpenSource) निवडा. यामध्ये तुम्हाला मनमोकळेप्रमाणे आवश्यक ते बदल करता येईल. व तुम्ही कॉपीराईट या प्रकारापासून होणाय्रा त्रासापासून वाचू शकाल. कॉपीराईट सॉफ़्टवेअर परवानगी शिवाय बदलविता येत नाही.
२)तुम्हाला भाषांतरित करायचे असलेल्या सॉफ़्टवेअरच्या व्यासपीठाशी (forum) जुळून घ्या. तेथे तुम्हाला भाषांतर (Localization) कसे करावे याबद्दलची माहिती उपलब्ध असते किंवा त्या सॉफ़्टवेअरच्या डेवलपरशी तुम्ही संपर्क साधून माहिती मागवू शकता.
३)भाषांतर करतांना तुम्हाला पूर्ण साफ़्टवेअर न बदलविता एखादी (किंवा काही थोड्या) फ़ाईल बदलव्या लागतील. सर्वसाधारणपणे ह्या फ़ाईल नोटपॅड मध्ये उघडता येतात.
४)भाषांतर करण्यापुर्वी उपलब्ध इंग्रजी फ़ाईलच्या दोन प्रती बनवा व एक प्रत सुरक्षित ठिकाणी ठेवा. नंतर दुसय्रा फ़ाईलला किंवा फ़ोल्डरला (अनेक फ़ाईल असल्यास) योग्य नाव द्या.
उदाहरणार्थ: phpfusion मध्ये इंग्रजी भाषेच्या फ़ाईल "English" या फ़ोल्डरमध्ये असतात.
या फ़ोल्डरची एक दुसरी प्रत(copy) बनवून त्याला "Marathi" हे नाव द्या.
phpbb मध्ये इंग्रजी भाषेच्या फ़ाईल "lang_english" या फ़ोल्डरमध्ये असतात.
या फ़ोल्डरची एक दुसरी प्रत(copy) बनवून त्याला "lang_marathi" हे नाव द्या.
तसेच 7-zip मध्ये इंग्रजी भाषेची फ़ाईल "en.txt"या नावाने असते.
या फ़ाईलची एक दुसरी प्रत(copy) बनवून त्याला "mr.txt" हे नाव द्या.
५)त्यानंतर तुम्हाला काय शब्द इंग्रजीपासुन मराठीत लिहायचे आहे ते लिहा. बदल असा हवा असतो:
उदाहरणार्थ:
7-zip :

Info Page

01000100 = "About 7-Zip"
01000103 = "7-Zip is free software. However, you can support development of 7-Zip by registering."
01000104 = "Support"
01000105 = "Register"

हे असे होईल :

Info Page

01000100 = "7-Zip बद्दल माहिती"
01000103 = "7-Zip हे मोफ़त सॉफ़्टवेअर आहे. तरिही, तुम्ही नोंद करून याच्या प्रगतीला साहाय्य करू शकता."
01000104 = "साहाय्यता"
01000105 = "नोंद"

तुम्हाला फ़क्त "" यामधिल शब्द बदलावे लागतील. हे सर्वसाधारणपणे सर्व सॉफ़्टवेअरमध्ये असते.
६)शब्द निवडतांना त्याचा अर्थ शब्दकोशातून घ्यावा किंवा न मिळाल्यास जुळता-मिळता पण सर्वांच्या लक्षात यावा असा घ्यावा.
७)भाषांतर पूर्ण झाल्यावर संकेतस्थळावर देण्यापुर्वी त्याला स्वतः व तसेच परिचितांकडून तपासून घ्यावे.
८)भाषांतर पूर्ण पणे ठीक असल्याची खात्री झाल्यावर त्या सॉफ़्टवेअरच्या डेवलपरशी संपर्क साधून त्याला कळवावे व पाठवावे. ते भाषांतर त्यांच्या सॉफ़्टवेअरच्या संकेतस्थळावर उपलब्ध करतात.
९)सॉफ़्टवेअरचे भाषांतर तयार झाल्यावर त्याचे नूतनीकरण करत राहावे म्हणजे जसे त्या सॉफ़्टवेअरचे नवीन वर्जन निघेल त्याचे मराठी भाषांतर लवकरच तयार करावे जेणेकरून मराठी सॉफ़्टवेअर उपयोगात आणय्रांना नवीन वर्जन वापरणे शक्य होईल व त्यात खंड पडणार नाही. त्यासाठी संबधित सॉफ़्टवेअरवर लक्ष्य ठेवणे आवश्यक आहे.