मराठीचे विद्यापीठ
मराठी विद्यापीठ चळवळमराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून द्यायचा असेल तर सर्वप्रथम मराठीच विद्यापीठ महाराष्ट्रात असायला हवं. आज रामटेक येथे संस्कृत विद्यापीठ आहे तर वर्धा येथे हिंदीचे केंद्रीय विद्यापीठ आहे.कर्नाटकात कन्नड भाषेचे विद्यापीठ आहे मग मराठीचे विद्यापीठ का असू नये? हा साधा आणि सोपा प्रश्न आम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. यासंबंधी विद्यापीठ आराखडा समितीने २०१४ साली सरकारला आराखडा सादर केला, परंतु या संदर्भांत समाज,साहित्यिक,लेखक,संघटना यांनीही प्रत्यक्ष पाठिंबा द्यायला हवा. यासंबंधी काही लेखकानी तो प्रयत्नही केला आहे महानुभाव साहित्याचे गाढे अभ्यासक वि.भी.कोलते, राम शेवाळकर, दत्तो वामन पोतदार,कै. महंत नागराज बाबा ही जुनी मंडळी त्यात होती. आज त्यात नागनाथ कोतापल्ले,श्रीपाल सबनीस,सदानंद मोरे,श्रीपाद जोशी, बा.भो.शास्त्री आदींचा समावेश आहे. जर मराठी विद्यापीठ आज असेल तरच आपण मराठीला अभिजात दर्जा द्या असं म्हणू शकतो, नाही तर केंद्र सरकार आपल्याच राज्यावरती बोट ठेवण्याचा प्रयत्न करते. यासाठी पहिले मराठीचे विद्यापीठ स्थापन व्हावे अशी अपेक्षा आहे. या विद्यापीठामुळे मराठी भाषेत सर्व स्तरावरील कला,ज्ञान,संशोधन,तंत्रज्ञान हे मराठीत असावेत ही मागणी फलद्रूप होईल तसेच त्यामुळे महत्त्वाचे दुर्मिळ हस्तलिखित,ग्रंथ अनुवाद,भाषा विकास आदी कामे मार्गी लागतील.
पहिली मागणी (साहित्य संमेलन)
मराठी विद्यापीठाची सर्वप्रथम कल्पना ही नागपूर येथील १९३३ मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनात समोर आली. महानुभाव साहित्य संमेलन,मुस्लिम मराठी साहित्य संमेलन,भानुकवी मराठी साहित्य संमेलन,चक्रधरस्वामी मराठी साहित्य संमेलन, रुद्धपुर येथील धर्म परिषद,महदंबा साहित्य संमेलन,अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनातही हे विद्यापीठ रुद्धपुर येथे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी विद्यापीठ चळवळीची सुरुवात
मराठी विद्यापीठासाठी सर्वप्रथम मागणी केली गेली ती रिद्धपुर या ठिकाणी. तेव्हा कोणतीही मागणी इतर लोकांची नव्हती परंतु जेव्हा रुद्धपुर येथे मागणी होत आहे असे लक्षात आल्यावर अंबाजोगाई, नेवासा इथून उगीच राजकीय दबावात एक खेळी खेळली गेली. अंबाजोगाईचा काहींच संदर्भ नसताना मुकुंदराजला पुढे केले गेले. नंतर महाराष्ट्र मधील सर्व साहित्यिकांनी मुकुंदराज यांचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की मुकुंदराज हे कवी ज्ञानेश्वरानंतर होऊन गेले आहे. आणि अंबाजोगाई का अंभोरा हा वादही पुढे आला. त्यामुळे मराठी भाषेच्या दृष्टीने त्यात काही तथ्य नव्हते.नंतर लीळाचरित्र लिखाण भूमी रुद्धपुर येथून हे विद्यपीठ व्हावं यासाठी महाराष्ट्र्तील सर्व साहित्यिकांनी पाठिंबा दिला. या संदर्भांत शासनाला पाठपुरावा करण्यात आला आहे. नुकतेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे चक्रधर स्वामींच्या नावे रुद्धपुर जि.अमरावती येथे विचाराधीन आहे असे वक्तव्य केले आहे.
विद्यापीठ स्थापन झाल्यास फायदा
मराठीचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन झाल्यास सर्व मानव्यविद्या,विज्ञाने,अभियांत्रिकी,तंत्रज्ञान,आयुर्विज्ञान आदी विषय हे मराठी भाषेतून शिकण्याचा एक चांगला पर्याय नवीन युवा वर्गापुढे राहू शकतो. पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण व संशोधन यांना चालना मिळेल. तसेच यामुळे मराठीतील शब्दसंग्रह वाढीस लागून अन्य विद्याशाखांमध्ये मराठीचे उपयोजन करता येईल.जागतिक पातळीवर वरचे साहित्याचे अनुवाद करून त्या-त्या भाषेतील वाङ्मयीन अनुभव अभ्यासता येईल.इतर भाषेतील असणारे शब्दांना पर्यायी शब्द शोधता येईल व भाषेची शब्द-संपत्ती वाढण्यास मदत होईल.
भाषा समिती
विद्यापीठ स्थापनेसाठी अनेक ठिकाणाहून प्रस्ताव आल्यामुळे समिती निर्णय घेत नाही, परंतु भाषिकदृष्ट्या आणि साहित्यिकदृष्टया योग्य असलेला निर्णय त्यांनी सुचवला तरच ही गोष्ट साध्य होईल. जेव्हा ही गोष्ट शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण खात्याकडे आली तेव्हा अखिल भारतीय महानुभाव परिषदेकडे १५ ऑक्टोबर २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण खात्याचे सचिव सिद्धार्थ खरात यांच्या सहिनीशी पत्र आले की, रुद्धपुर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्यात येत आहे.
मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने उच्चशिक्षणमंत्री यांच्या दालनात मराठी भाषा विद्यापीठास्थापनेबाबतचा अहवाल सादर केला. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, सदस्य प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. अविनाश आवलगावकर, कारंजेकर बाबा, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर आदी उपस्थित होते.
मराठी भाषा विद्यापीठ रुद्धपुरलाच
मराठीचा आद्यग्रंथ लीळाचरित्र ग्रंथाचे लिखाण वाजेश्वरी(रुद्धपुर) जि. अमरावती या ठिकाणी झाले आहे. मराठी प्रकांड पंडित महिमभट्ट सरालेकार (अहमदनगर) यांनी महानुभाव पंथाचे पहिले आचार्य नागादेवाचार्य यांच्या प्रेरणेने लिहिला गेला आहे. मराठी बोली भाषेचा आणि प्रमाण भाषेचा लिखित स्वरूपात पाया घालण्याचे काम लीळाचरीत्राच्या माध्यमातून रिद्धपुरात झाले आहे, त्यासोबतच मराठी भाषेतील अनेक सांकेतिक लीप्यांची रचना व निर्मितीचे ज्ञानकेंद्र म्हणून मध्ययुगीन काळापासून श्रीक्षेत्र रिद्धपूरची ख्याती आहे, गोविंद प्रभूंच्या प्रेरणेने आद्य कवयित्री महदंबा(रामसगाव) हिने धवळे हा नवीन काव्यप्रकार निर्मिला आहे. रुद्धपुर याच भूमी ‘रिद्धपूर वर्णन’ नावाचा सर्वांग सुंदर रचला गेला आहे. या पावन भूमीत मध्ययुगीन काळात आणि पुढे अनेक समकालीन विद्वान, साहित्यप्रेमी, कवी, लेखकांना भाषा, साहित्य, लिपी यासंबंधात लिखाण स्फूर्ती देण्याचे महत्त्वाचे काम काम रिद्धपूर या गावाने दिले आहे.
अधिकृत स्थापना
दिनांक १ जुन २०२४ पासून मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूरला सुरू होईल.
कुलगुरू
पहीले कुलगुरू डॉ. आवलगांवकर यांची नियुक्ती ३ सप्टेंबर २०२४ रोजी झाली.
उपकेंद्रे (राज्य)
- नांदेड
- अंबाजोगाई
- पंढरपूर
- सावंतवाडी
- गडचिरोली
- औंध
- पुणे
- मुंबई
- धुळे
- नाशिक
अभ्यासक्रम
- महाराष्ट्रालॉजी
- भाषा व लिपीविज्ञान
- मराठी विश्वकोशवाङ्मय
- भाषांतर विद्या व तौलनिक साहित्य अभ्यासक्रम
मराठी साहित्यिक आणि भाषा संशोधनाच्या दृष्टीकोनातून..
आजकाल स्वयंरोजगार मिळवुन देणाऱ्या भाषेचा स्वीकार विद्यार्थी लवकर करतात म्हणून विद्यार्थ्यांचा कल मराठीऐवजी इंग्रजीकडे वाढला आहे. मराठीसुद्धा रोजगाराची भाषा व्हावी म्हणून मराठी विद्यापीठाची स्थापना केली जाणे साहित्यिकांच्या दृष्टिकोनातून योग्य आहे. मराठी भाषा टिकवताना तिला रोजगाराची जोड द्यावी, विविध पूरक अभ्यासक्रम राबवावेत तरच रोजगाराच्या संधी वाढेल. राज्यातील विद्यापीठांत स्वतंत्र मराठी विभागही आहेत; मात्र हे विभाग मराठीचा केवळ वाङ्मयीन दृष्टिकोनातून आणि अभ्यासक्रम यापुरता मर्यादित विचार यात असतो. आज मराठी विषयात निष्णात असणाऱ्या अभयसकांची मागणी खूप ठिकाणी होत आहे. तसेच तेलगू,मल्याळम,बंगाली,गुजराती,हिंदी भाषिक लोकांना मराठीचे विशेष असे आकर्षण आहे. व्यापाराच्या निमित्ताने ही मंडळी महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यात स्थायिक झाली आहे. त्यानिमित्ताने बहुतेक वर्ग हा मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या पाल्याला चांगली मराठी बोलता यावी म्हणून हल्ली शुद्ध मराठी शिकवण्याचे शिकवणी वर्ग विदर्भात पाहायला मिळतात. विदेशातही विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकवणी वर्ग चालू झालेले आहे. उत्कृष्ट मराठी शिकवणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक यांची मागणी तेथील विद्यापीठाकडून नेहमी होत असते.याशिवाय नागरी सेवा परीक्षा, आकाशवाणी, पत्रकारिता, प्रकाशक संस्था, भाषा संचालनालय या ठिकाणीही उकृष्ट मराठी जाणकारांची आवश्यकता भासते.
सध्या शासनामार्फत भाषाविषयक अनेक महत्त्वाचे अनुवादाचे प्रकल्प हाती घेतले जातात. उत्कृष्ट अनुवादकांची आज बरीच मागणी होत असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी साहित्य पोहचवण्यासाठी अशा अनुवादकांचे सहकार्य हे महत्त्वाचे आहे. मराठीचे विद्यापीठ स्थापन झाल्यास या प्रकल्पाला गती येईल. Jamodekar (चर्चा) ११:४५, २६ नोव्हेंबर २०१९ (IST) Jamodekar (चर्चा) ११:४४, २६ नोव्हेंबर २०१९ (IST)