Jump to content

मराठा-मुघल २७ वर्षाचे युद्ध

मराठा मुघल २७ वर्षाचे युद्ध हे भारतीय इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चाललेले युद्ध होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य संपवण्याच्या दृष्टीने औरंगजेबाने पूर्णशक्तीनीशी मराठा राज्यावर आक्रमण केले. १६८१ मध्ये सुरू झालेले हे युद्ध १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर थांबले. या युद्धामध्ये विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाहीसारखी मोठी राज्ये मुघल आक्रमणापुढे संपुष्टात आली परंतु तुलनेने लहान असे मराठ्यांचे राज्य संपवण्यात मुघलांना पूर्णतः अपयश आले खूप मोठ्या प्रमाणावर व दीर्घकाळ मुघल राज्याची संपत्ती या मोहिमेत खर्च झाली त्यामुळे नंतरच्या काळात मुघल साम्राज्याचा विस्तार थांबला व काही वर्षातच मुघल साम्राज्य हे छोट्या राज्यापुरते मर्यादित झाले. या नंतर मराठे, राजपूत जाट व शीख यांचे भारतावर वर्चस्व स्थापन झाले. यानंतर सर्व भारतावर मराठा साम्राज्य विस्तार झाला