Jump to content

मराठवाडा साहित्य परिषद

मराठवाडा साहित्य परिषद ही महाराष्ट्र साहित्य परिषदेची एक संलग्न संस्था आहे. इ.स. १९४३ साली 'दुसरे निजाम साहित्य संमेलन, नांदेड' येथे झाले. त्यावेळी म्हणजे २९ सप्टेंबर १९४३ रोजी 'मराठवाडा साहित्य परिषद' या नावाची स्थायी स्वरूपाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय झाला. एकवीस सभासदांची अस्थायी कार्यकारिणी स्थापन करण्यात आली व तिचे कार्यालय सध्या नांदेडला असावे असे ठरविण्यात आले. पहिले तात्पुरते कार्यकारी मंडळ - अध्यक्ष - दत्तो वामन पोतदार कार्याध्यक्ष - दे.ल. महाजन चिटणीस - ग.ना. अंबेकर, श्री. रं. देशपांडे सदस्य - सर्वश्री दिगंबरराव बिंदू, दिवाकर कृष्ण केळकर, वि.अं. कानोले, शंकरराव टेकळीकर, दासराव बोकील, व्यंकटराव देशमुख, नारायणराव जोशी, प्रभाकरराव देशमुख, भी.कृ. वाघमारे, वि.पां. देऊळगावकर, हनुमंतराव वैष्णव, स.मा.गर्गे, केशवराव पत्की, वि.भा. पाठक, बापुसाहेब इटगापल्लीकर, वा.दा. गाडगीळ, सौ. उषाताई पगडी व श्री. न. शे. पोहनेरकर इ.[] सध्या मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यालय औरंगाबाद येथे सन्मित्र कॉलनीत आहे. परिषदेच्या औरंगाबाद, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, उदगीर, पैठण, जालना, हिंगोली आदी ठिकाणी शाखा आहेत. ही परिषद मराठवाडा साहित्य संमेलन, मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन आणि मराठवाडा ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवते. कौतिकराव ठाले पाटील हे सन २०१५पासून संस्थेचे अध्यक्ष आहेत.

अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच 'मराठवाडा साहित्य परिषद ही संस्था साहित्य संमेलने, मराठवाडा लेखिका साहित्य संमेलने व ग्रामीण साहित्य संमेलनेही भरवते. संस्थेचे स्वतःचे पुस्तक प्रकाशन आहे.

मुखपत्र

मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘प्रतिष्ठान’ नावाचे मुखपत्र आहे. प्रा. डाॅ. ना.गो.नांदापूरकर, दा.गो.देशपांडे, भगवंत देशमुख, तु.शं. कुलकर्णी, सुधीर रसाळ,नागनाथ कोत्तापल्ले, महावीर जोंधळे, बाळकृष्ण कवठेकर, रवींद्र किंबहुने , लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी हे मुखपत्राचे आजवरचे संपादक आहेत. त्यानंतर आसाराम लोमटे हे संपादक झाले.[]


मराठवाडा साहित्य परिषद प्रकाशन

मराठवाडा साहित्य परिषद ही संस्था ग्रंथ प्रकाशनाचे कामही करते.परिषदेने प्रकाशित केलेले काही प्रसिद्ध ग्रंथ :

  • अश्वत्थाची फुले (प्रमिलाताई भालेराव}
  • गंधवेणा -काव्य (गजमल माळी}
  • गीतार्थबोध चंद्रिका (भ,व्यं देशमुख)
  • दासोपंतांची पासोडी (न.शे. पोहनेकर)
  • देवगिरी (न.शे. पोहनेकर)
  • नवनीतातील पाच वेचे
  • मुक्त-मयुरांची भारतें (ना.गो.नांदापुरकर}
  • रघुनाथ यादव विरचित पानिपतची बखर (रघुनाथ मुरलीधर जोशी)
  • रिचर्ड्‌सची कलामीमांसा (नरहर कुरुंदकर)
  • शांतिपर्वांतील कथा (स.मा गर्गे)
  • संचित -काव्य(राम शेवाळकर)
  • सौंदर्याचे व्याकरण (डॉ.सुरेंद्र शिवदास बारलिंगे)
  1. ^ मोरे, संगीता. ‘प्रतिष्ठान’ची सूची (सप्टें.१९५३ ते ऑग.२००३).
  2. ^ मोरे, संगीता. ‘प्रतिष्ठान’ची सूची (सप्टें.१९५३ ते ऑग.२००३).