मन झालं बाजिंद |
---|
दिग्दर्शक | अनिकेत साने |
---|
निर्माता | तेजपाल वाघ |
---|
निर्मिती संस्था | वाघोबा प्रोडक्शन |
---|
कलाकार | खाली पहा |
---|
देश | भारत |
---|
भाषा | मराठी |
---|
एपिसोड संख्या | २६१ |
---|
निर्मिती माहिती |
---|
प्रसारणाची वेळ | सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता |
---|
प्रसारण माहिती |
---|
वाहिनी | झी मराठी |
---|
प्रथम प्रसारण | २३ ऑगस्ट २०२१ – ११ जून २०२२ |
---|
अधिक माहिती |
---|
आधी | महा मिनिस्टर |
---|
नंतर | मन उडू उडू झालं |
---|
मन झालं बाजिंद ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.
कलाकार
- वैभव चव्हाण - रायबान (राया) भाऊसाहेब विधाते
- श्वेता खरात - कृष्णा गोविंद फुले / कृष्णा रायबान विधाते
- विकास हांडे - दादासाहेब विधाते
- कल्पना सारंग - फुई दादासाहेब विधाते
- राजेश अहेर - भाऊ दादा विधाते
- वैशाली राजेघाटगे - रंजना भाऊसाहेब विधाते
- कल्याणी चौधरी - गुली
- रियाझ मुलानी - हृतिक
- सानिका काशीकर - अंतरा प्रदीप बोराटे / अंतरा हृतिक
- भरत शिंदे - सोपान राऊत
- बीना सिद्धार्थ - आशा सोपान राऊत
- तानाजी गालगुंडे / गजानन कांबळे - मनोज (मुंज्या)
- अरबाज शेख - पप्या
- सचिन हगवणे-पाटील - मदन
- भक्ती झणझणे - मुंज्याची आई
- योगेश देशपांडे - विश्वजीत धर्माधिकारी
- सुवर्णा चोथे - सारिका प्रदीप बोराटे
- सुरेंद्र साठे - प्रदीप बोराटे
- अंकिता नरवणेकर - गौरी
- नीलिमा कामणे - मिंटीची आई
- सुनील गोडबोले
- धनंजय जामदार
विशेष भाग
- तुझ्या एका दिठीसाठी जीव उधळून देतो, बाजिंदा रंगाचं आभाळ पांघरून घेतो. (२३ ऑगस्ट २०२१)
- मदत मागण्यासाठी आलेल्या रायाला कृष्णानेच लावलं कामाला. (२४ ऑगस्ट २०२१)
- गुली मावशीने टाकलेल्या जाळ्यातून कशी सावरणार कृष्णा? (२६ ऑगस्ट २०२१)
- वाजतगाजत गणरायाचं आगमन होणार, कृष्णाच्या रूपात रायाच्या लग्नातील विघ्न दूर होणार. (२८ ऑगस्ट २०२१)
- गौरीपूजनाच्या दिवशी गुली मावशीने दुखावला कृष्णाचा स्वाभिमान, परत कसा मिळवेल कृष्णा आपला सन्मान? (३१ ऑगस्ट २०२१)
- पाताळयंत्री गुली मावशीने रायाच्या लग्नासाठी केली कृष्णाचीच निवड. (२ सप्टेंबर २०२१)
- रायाशी लग्न करण्यासाठी कृष्णाच योग्य, गुली मावशीने रंजनालाच टाकले कोड्यात. (४ सप्टेंबर २०२१)
- कृष्णाचा प्रामाणिकपणा कौतुकास पात्र ठरणार का? (६ सप्टेंबर २०२१)
- एकीकडे आजारी मामीची काळजी अन् दुसरीकडे कारखान्याचं काम, यातून कसा मार्ग काढेल कृष्णा? (८ सप्टेंबर २०२१)
- कृष्णाला समजून घेण्याचा रायाचा प्रयत्न यशस्वी होईल का? (९ सप्टेंबर २०२१)
- क्लासचा अभ्यास आणि कारखान्याचं काम, ही दुहेरी कामगिरी कशी पार पाडणार कृष्णा? (१० सप्टेंबर २०२१)
- कारखान्याच्या कामाच्या बाबतीत कृष्णाने केलं रायाला सावध. (१३ सप्टेंबर २०२१)
- कृष्णाच्या शिक्षणावरून भाऊसाहेबांचा रायाला ओरडा, कृष्णाला समजून घेईल का राया? (१५ सप्टेंबर २०२१)
- कामाच्या धावपळीने कृष्णाला आली चक्कर, कृष्णा परीक्षा देऊ शकणार का? (१८ सप्टेंबर २०२१)
- जीवावर उदार होऊन मामीने केलेली मदत कृष्णाला नवी उमेद देणार. (२० सप्टेंबर २०२१)
- कृष्णा आणि मामाच्या विश्वासाच्या नात्याला गुली मावशी सुरूंग लावणार. (२२ सप्टेंबर २०२१)
- कृष्णाच्या कुटुंबाचा गुली मावशीच्या षडयंत्रापुढे कसा निभाव लागणार? (२३ सप्टेंबर २०२१)
- राया दुखावलेल्या कृष्णाची कशी समजूत काढणार? (२५ सप्टेंबर २०२१)
- रायाच्या मदतीला धावून येणार का कृष्णा? (२७ सप्टेंबर २०२१)
- कृष्णाच्या मदतीने भारावून गेलेला राया तिच्यासमोर आपलं मन मोकळं करणार का? (३० सप्टेंबर २०२१)
- भाऊसाहेबांनी फक्त कृष्णाचंच कौतुक केल्यामुळे राया दुखावला जाईल का? (२ ऑक्टोबर २०२१)
- नव्या मालकाच्या येण्यामुळे राया आणि कृष्णामधील गैरसमज वाढणार का? (४ ऑक्टोबर २०२१)
- कृष्णा हळदीचा कारखाना सोडून जाणार हा रायाचा गैरसमज खरा ठरणार का? (६ ऑक्टोबर २०२१)
- भाऊसाहेबांचा मान राखण्यासाठी गुली मावशीच्या वचनात अडकणार का कृष्णा? (९ ऑक्टोबर २०२१)
- बाजिंद्या रंगात रंगणार राया-कृष्णाचा लग्नसोहळा. (१२ ऑक्टोबर २०२१)
- रायाशी लग्न झाल्यावर सासरच्या उंबरठ्यावरचे माप कृष्णा ओलांडू शकेल का? (१४ ऑक्टोबर २०२१)
- रायाशी कृष्णाची बांधलेली लग्नगाठ अधिक दृढ होणार, कृष्णा परत येणार का? (१७ ऑक्टोबर २०२१)
- जीवघेण्या अपघातातून वाचल्यावर कृष्णा पहिल्यांदा ओलांडणार सासरचा उंबरा. (१९ ऑक्टोबर २०२१)
- दिवाळी पहाट राया-कृष्णाच्या नात्याला दाखवेल का प्रेमाची वाट? (२१ ऑक्टोबर २०२१)
- दिवाळसणाच्या निमित्ताने राया-कृष्णामधील अंतर मिटेल का? (२३ ऑक्टोबर २०२१)
- रायाच्या बदललेल्या रूपाची कृष्णावर मोहिनी. (२५ ऑक्टोबर २०२१)
- रायामुळे कृष्णावरील जीवघेणा प्रसंग टळणार. (२७ ऑक्टोबर २०२१)
- रायाच्या चिडण्यामागचे कारण कृष्णाला कळणार का? (२८ ऑक्टोबर २०२१)
- सुनेचे कर्तव्य पार पाडताना कृष्णाला मिळेल का रायाची साथ? (२९ ऑक्टोबर २०२१)
- राया-कृष्णाच्या गाडीला अपघात, गुरुजींचं भाकित खरं होणार का? (१ नोव्हेंबर २०२१)
- माहेरावर आलेलं संकट कृष्णाला कळणार का? (४ नोव्हेंबर २०२१)
- राया आणि कृष्णामध्ये पुन्हा भांडण, कृष्णा घेणार कठोर निर्णय. (६ नोव्हेंबर २०२१)
- सासरी जायचं स्वप्न पाहणाऱ्या कृष्णाचं माहेर राया सावरणार. (९ नोव्हेंबर २०२१)
- ट्रकमधून आली रायाची स्वारी न्यायला कृष्णाला सासरी. (११ नोव्हेंबर २०२१)
- राया आणि कृष्णा घरच्यांना त्यांच्यातील नात्याविषयी सांगणार का? (१३ नोव्हेंबर २०२१)
- घरच्यांचा मान ठेवून राया आणि कृष्णा निघाले हनिमूनला. (१६ नोव्हेंबर २०२१)
- रायाचं सांभाळून घेणं कृष्णाला आवडू लागलंय, हे प्रेम तर नाही ना! (१८ नोव्हेंबर २०२१)
- राया-कृष्णाच्या संसारात गुली मावशी मिठाचा खडा टाकणार. (२१ नोव्हेंबर २०२१)
- कृष्णाला लागलेली प्रेमाची चाहूल रायाला समजेल का? (२२ नोव्हेंबर २०२१)
- रायाच्या बाजिंदपणाची कृष्णावर मोहिनी. (२४ नोव्हेंबर २०२१)
- कृष्णाच्या आयुष्यात आलेलं प्रेमाचं वळण स्वप्नच राहणार की सत्यात उतरणार? (२६ नोव्हेंबर २०२१)
- विधाते कुटुंबाचा गोड गैरसमज, कृष्णा देणार गोड बातमी! (२९ नोव्हेंबर २०२१)
- कृष्णा सासूबाईंना देणार त्यांची सगळी स्वप्नं पूर्ण करण्याचं वचन. (३० नोव्हेंबर २०२१)
- रंजनाला कृष्णाच्या विरोधात भडकवण्यासाठी गुली मावशी रचणार कारस्थान. (२ डिसेंबर २०२१)
- भाऊसाहेब कारखान्याची पूर्ण जबाबदारी कृष्णावर सोपवणार. (४ डिसेंबर २०२१)
- विधाते कुटुंबात फूट पडल्याच्या बातमीमुळे राया आणि भाऊसाहेबांमधील वडील-मुलाचं नातं पणाला लागणार. (८ डिसेंबर २०२१)
- कारस्थानी गुली मावशीमुळे कृष्णाचा जीव धोक्यात, राया तिला वाचवू शकेल का? (१० डिसेंबर २०२१)
- शेतात अचानकपणे लागलेल्या आगीत राया-कृष्णा सापडणार. (१३ डिसेंबर २०२१)
- गुली मावशीने रचलेल्या कारस्थानामुळे विधाते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळणार. (१५ डिसेंबर २०२१)
- राया-कृष्णा घर सोडून शेतावर जाणार. (१७ डिसेंबर २०२१)
- कारखान्याची नवी मालकीण म्हणून कृष्णाचा पहिलाच दिवस ठरणार शेवटचा. (१९ डिसेंबर २०२१)
- कृष्णाला वाचवण्यात डॉक्टर यशस्वी होतील का? (२२ डिसेंबर २०२१)
- रायाचं बाजिंद प्रेम जिंकणार, कृष्णाचा जीव वाचणार. (२५ डिसेंबर २०२१)
- मकरसंक्रांतीच्या दिवशी राया कृष्णाला घेऊन घरी येणार, आजन्म साथ देण्याचं वचन पाळणार. (२७ डिसेंबर २०२१)
- कृष्णाची पतंग उडवण्याची इच्छा राया पूर्ण करणार. (२९ डिसेंबर २०२१)
- कृष्णा लग्नानंतरचं पहिलं हळदीकुंकू आनंदात साजरं करु शकणार का? (३१ डिसेंबर २०२१)
- कृष्णाला सी.ए.च्या परीक्षेसाठी लेखनिक मिळणार का? (२ जानेवारी २०२२)
- सी.ए.ची परीक्षा देण्याआधी राया-कृष्णामध्ये भांडण होणार. (५ जानेवारी २०२२)
- रायाच्या सुखासाठी कृष्णा घर सोडून जाणार. (७ जानेवारी २०२२)
- राया कृष्णाला शोधण्यात यशस्वी होईल का? (१० जानेवारी २०२२)
- रंजना कृष्णाला वचनाच्या बंधनात अडकवणार. (११ जानेवारी २०२२)
- रायाच्या सुखासाठी कृष्णा घेणार टोकाचा निर्णय. (१३ जानेवारी २०२२)
- कृष्णाला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी राया दुसऱ्या लग्नाला होकार देणार का? (१५ जानेवारी २०२२)
- जीव धोक्यात घालून कृष्णा करणार आपल्या कुंकवाचं रक्षण. (१७ जानेवारी २०२२)
- रायाच्या आयुष्यात आलेल्या दुसऱ्या मुलीमुळे कृष्णाचा जळफळाट होणार. (२० जानेवारी २०२२)
- कृष्णाचा त्याग की रायाचं प्रेम, यामध्ये कोण जिंकणार? (२२ जानेवारी २०२२)
- राया-कृष्णाच्या सुखी संसारात गुली मावशी आणणार वादळ. (२४ जानेवारी २०२२)
- अंतराचं दुसरं लग्न लावण्याची जबाबदारी राया-कृष्णा घेणार. (२६ जानेवारी २०२२)
- राया-कृष्णाचा सुखी संसार उधळून लावण्यासाठी गुली मावशी नवा डाव टाकणार. (२९ जानेवारी २०२२)
- अंतरा आणि गुली मावशीमुळे आलेल्या संकटाचा सामना राया-कृष्णा कसा करणार? (३१ जानेवारी २०२२)
- राया-कृष्णाला कायमचं वेगळं करण्याची अंतरा घेणार शपथ. (२ फेब्रुवारी २०२२)
- विधातेंच्या घरची लक्ष्मी रुसून जाण्याचा देवी संकेत देणार. (४ फेब्रुवारी २०२२)
- राया कृष्णाच्या घरी जाऊन तिचा गैरसमज दूर करु शकेल का? (७ फेब्रुवारी २०२२)
- भाऊसाहेब कृष्णाला मानाने घरी आणायची जबाबदारी रंजना आणि गुली मावशीवर सोपवणार. (९ फेब्रुवारी २०२२)
- राया आणि अंतराची कारखान्यातील जवळीक पाहून कृष्णा दुखावली जाणार. (१० फेब्रुवारी २०२२)
- राया आणि कृष्णाची ताटातूट पाहून फुई आजीचा संताप होणार. (१२ फेब्रुवारी २०२२)
- आजारपणात फुई आजीची काळजी घेऊन कृष्णा नातसुनेचं कर्तव्य निभावणार. (१४ फेब्रुवारी २०२२)
- महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर राया-कृष्णामधील गैरसमज दूर होणार का? (१६ फेब्रुवारी २०२२)
- राया-कृष्णामधील गैरसमज दूर करण्यासाठी फुई आजी पुढाकार घेणार. (१८ फेब्रुवारी २०२२)
- राया त्याच्या कृष्णावरील प्रेमाबद्दल रंजनाला ठणकावून सांगणार. (२० फेब्रुवारी २०२२)
- राया-कृष्णामधील गैरसमज टोक गाठणार. (२२ फेब्रुवारी २०२२)
- विधातेंची सून म्हणून मानाने घरी घेऊन जाण्याचं राया कृष्णाला वचन देणार. (२५ फेब्रुवारी २०२२)
- रायाने आणलेलं खास गिफ्ट कृष्णा स्वीकारेल का? (२८ फेब्रुवारी २०२२)
- आपला संसार मोडण्यासाठी आईच कारणीभूत असल्याचं रायाला कळणार. (१ मार्च २०२२)
- राया कृष्णाला मानाने घरी घेऊन जाण्याचं वचन पूर्ण करणार. (२ मार्च २०२२)
- आईचा जीव की कृष्णाचं प्रेम, काय असेल रायाचा निर्णय? (४ मार्च २०२२)
- गुरुजी रायाला कृष्णाबद्दल धक्कादायक सत्य सांगणार. (६ मार्च २०२२)
- राया कृष्णासाठी घराचा दरवाजा कायमचा बंद करणार. (७ मार्च २०२२)
- राया-कृष्णाच्या प्रेमाला देवीचा आशीर्वाद मिळणार का? (९ मार्च २०२२)
- कृष्णासाठी राया जीवाची बाजी लावणार. (११ मार्च २०२२)
- कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी राया काळ बनून उभा राहणार. (१४ मार्च २०२२)
- बगाडाचा नवस राया पूर्ण करु शकेल का? (१६ मार्च २०२२)
- मृत्यूचं बोलावणं घेऊन आलेल्या काळाला राया-कृष्णाचं प्रेम रोखू शकेल का? (२३ मार्च २०२२)
- बगाडाच्या यात्रेत कृष्णाला पाहून रायाच्या काळजाचा ठोका चुकणार. (२६ मार्च २०२२)
- कृष्णावरील जीवघेणं संकट कायमस्वरूपी टळणार का? (२८ मार्च २०२२)
- आपल्या प्रेमासाठी राया देवीशी भांडणार. (३० मार्च २०२२)
- रायाला कृष्णासोबतचं नातं टिकवण्यासाठी नवा मार्ग सापडणार. (१ एप्रिल २०२२)
- होणार राया-कृष्णाची शेवटची भेट. (४ एप्रिल २०२२)
- राया-कृष्णा आपल्या प्रेमासाठी देणार कठोर परीक्षा. (६ एप्रिल २०२२)
- विधिलिखिताशी लढून राया-कृष्णाचं प्रेम जिंकेल का? (८ एप्रिल २०२२)
- राया-कृष्णाचं प्रेम गुली मावशीच्या जीवघेण्या कारस्थानाला पुरून उरणार. (१० एप्रिल २०२२)
- जीवघेण्या संकटाचा सामना राया-कृष्णा कसा करणार? (१२ एप्रिल २०२२)
- कृष्णाचा तिच्या सासरी गृहप्रवेश होणार का? (१४ एप्रिल २०२२)
- सासरी खोटं-खोटं वागताना कृष्णाच्या डोळ्यात अश्रू दाटणार. (१६ एप्रिल २०२२)
- राया-कृष्णा त्यांच्या नात्याविषयी लपवलेलं सत्य फुई आजीला सांगणार. (२० एप्रिल २०२२)
- राया-कृष्णाचं लपवलेलं सत्य गुली मावशीला कळणार का? (२३ एप्रिल २०२२)
- दादासाहेबांच्या येण्याने कृष्णाच्या संसारात वादळ उठणार. (२६ एप्रिल २०२२)
- दादासाहेबांकडून कृष्णाला मिळणार का नातसुनेचं स्थान? (२८ एप्रिल २०२२)
- दादासाहेब कृष्णाला कारखान्यात काम करण्यासाठी जाऊ देणार का? (३० एप्रिल २०२२)
- राया कृष्णाला कोणती आनंदाची बातमी सांगणार?
(३ मे २०२२) - राया-कृष्णाने लपवलेल्या सत्याचा सुगावा गुली मावशीला लागणार का?
(६ मे २०२२) - दादासाहेबांच्या आनंदासाठी घरात पूजा घालण्याचा पर्याय कृष्णा सुचवणार.
(९ मे २०२२) - दादासाहेबांना राया-कृष्णाने लपवलेलं सत्य कळणार का?
(१२ मे २०२२) - कृष्णाच्या पुरस्कार सोहळ्यात विधाते कुटुंब पोहोचणार का?
(१५ मे २०२२) - राया-कृष्णाचा पहिला मुंबई प्रवास आनंदाचा ठरेल का?
(१८ मे २०२२) - राया-कृष्णा घर सोडून जाणार.
(२१ मे २०२२) - कुटुंबाच्या वाईटावर टपलेल्या गुली मावशीला कृष्णा थेट आव्हान देणार.
(२४ मे २०२२) - रायाने कष्टाने उभारलेल्या हळदीच्या कारखान्याला कायमचं टाळं लागणार.
(२७ मे २०२२) - हळदीच्या भेसळप्रकरणी राया आणि भाऊसाहेबांना अटक होणार. (३१ मे २०२२)
बाह्य दुवे