मन्सूर अली खान पटौदी
मन्सूर अली खान पटौदी भारत | ||
फलंदाजीची पद्धत | उजव्या हताने फलंदाजी | |
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने मध्यमगती | |
कसोटी | प्रथम श्रेणी | |
सामने | ४६ | ३१० |
धावा | २७९३ | १५४२५ |
फलंदाजीची सरासरी | ३४.९१ | ३३.६७ |
शतके/अर्धशतके | ६/१६ | ३३/७५ |
सर्वोच्च धावसंख्या | २०३* | २०३* |
चेंडू | १३२ | ११९२ |
बळी | १ | १० |
गोलंदाजीची सरासरी | ८८.०० | ७७.५९ |
एका डावात ५ बळी | - | - |
एका सामन्यात १० बळी | - | - |
सर्वोत्तम गोलंदाजी | १/१० | १/० |
झेल/यष्टीचीत | २७/- | २०८/- |
क.सा. पदार्पण: १३ डिसेंबर, १९६१ |
मन्सूर अली खान पटौदी (उर्दू: منصور علی خان ; रोमन लिपी: Mansoor Ali Khan ;), लघुनाम एम.ए.के. पटौदी (रोमन लिपी: M.A.K. Pataudi), टोपणनाव टायगर (५ जानेवारी, इ.स. १९४१; भोपाळ, ब्रिटिश भारत - २२ सप्टेंबर, इ.स. २०११; नवी दिल्ली, भारत) हा भारतीय क्रिकेट संघाकडून खेळलेला क्रिकेटखेळाडू व माजी कर्णधार होता. भारतीय राज्यघटनेतील २६व्या घटनादुरुस्तीनुसार[१] इ.स. १९७१ साली भारतातील संस्थानिकांचे सर्व वतनाधिकार रद्द होईपर्यंत हा पटौदी संस्थानाचा नववा व अखेरचा नवाब होता.
मन्सूर अली खानाने इ.स. १९६१ ते इ.स. १९७५ या काळात भारतीय क्रिकेट संघाकडून ४६ कसोटी सामने खेळले. तो प्रामुख्याने उजवखोरा फलंदाज म्हणून खेळत असे, तसेच उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजीही करत असे. इ.स. १९६२ ते इ.स. १९७० या काळात त्याने ४० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले व त्यांपैकी ९ सामने भारताला जिंकता आले.
फुप्फुसांच्या संसर्गामुळे नव्या दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलात दाखल होऊन उपचार चालू असताना २२ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी त्याचा मृत्यू झाला[२]. भारतीय चित्रपट-अभिनेत्री शर्मिला टागोर त्याची पत्नी असून हिंदी चित्रपट-अभिनेता सैफ अली खान व हिंदी चित्रपट-अभिनेत्री सोहा अली खान त्याची मुले आहेत.
संदर्भ
- ^ "भारताच्या राज्यघटनेतील २६वी घटनादुरुस्ती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन".[permanent dead link]
बाह्य दुवे
- "मन्सूर अली खान पटौदी - प्रोफाइल व आकडेवारी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा. |
मागील: नरी कॉंट्रॅक्टर | भारतीय क्रिकेट संघाचे नायक इ.स. १९६१ – इ.स. १९७० | पुढील: अजित वाडेकर |
मागील: अजित वाडेकर | भारतीय क्रिकेट संघाचे नायक इ.स. १९७४ – इ.स. १९७५ | पुढील: बिशनसिंग बेदी |