Jump to content

मनोविकार


मनाला होणाऱ्या विकारांना मनोविकार असे म्हणतात. मानसिक आजार हे एक प्रकारचे शारीरिक विकार होत. जेव्हा शरीरातील हृदय, किडनी व इतर अवयावान्प्रमानेच मेंदू आजारी पडतो तेव्हा मनोविकार होतात. हे बदल जैवरासायनिक द्रव्यांमध्ये किंवा मेंदूच्या जोडण्यांमध्ये होत असतात. असे बिघाड होण्यामागे अनुवांशिकता, परिसराचा प्रभाव, व्यक्तिमत्त्व, शारीरिक स्थिती अशी अनेक करणे असतात. मनोविकार अनेक प्रकारचे असतात. सहसा फक्त वेडेपणा सदृश आजार म्हणजे मनोविकार असे समजले जाते . पण हा गैरसमज आहे. वेडेपणा हे फक्त अनेक मनोविकारांमधील एका मनोविकाराच्या अनेक लक्षणांपैकी एक लक्षण आहे. नैराश्य, चिंता, मंत्रचळ, एखाद्या गोष्टीची अवास्तव आणि अतोनात भीती, उन्माद, स्मृतिभ्रंश, निद्रानाश, भुकेचे विकार, लैंगिकतेचे विकार, शारीरिक लक्षणांतून जाणवणारे मनोविकार, विविध प्रकारची व्यसने असे अनेक प्रकारचे मानसिक आजार असतात. हे आजार ओळखणारे, अभ्यासणारे, त्यावर उपचार करणारे शास्त्र म्हंजे मनोविकारशास्त्र. वैद्यकशास्त्राच्या मूलभूत अभ्यासानंतर,[MBBS] पदवी मिळाल्यावरच मनोविकार शास्त्राचा अभ्यास करता येतो. अनेक गैरसमज, कलंकभावना [STIGMA] .मेंदूच्या रचनेविषयी आणि कार्याविषयी अजूनही नसलेले स्पष्ट आणि पुरेसे ज्ञान यामुळे मनोविकारग्रस्त रुग्ण आजार लपवू बघतात