मनोरा
मनोरा म्हणजे एक उंच संरचना, जिची उंची ही रुंदीपेक्षा बरीच जास्त असते.खांबांस तणावाचे दोर असतात तर मनोऱ्यास ते नसतात त्यामुळे खांबांपासून त्यांचे वेगळेपण जाणवते.मनोरा ही 'स्वयंआधारीत संरचना' (सेल्फ सपोर्टेड स्ट्र्क्चर) असते.त्यांच्या उंचीचा वापर करण्यासाठी मनोरे बांधण्यात येतात.मनोऱ्याचा पाया बराच खोल असतो.मनोरा हा एखाद्या इमारतीचा किंवा बांधकामाचा एक भाग असु शकतो.