Jump to content

मनोज जोशी

मनोज जोशी
जन्ममनोज नवनीत जोशी
१ जून, १९५५ (1955-06-01) (वय: ६९)
गोरेगांव, रायगड जिल्हा, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मराठी नाटके, इंग्रजी नाटके
भाषामराठी, हिंदी, इंग्रजी
प्रमुख चित्रपटदशक्रिया, नारबाची वाडी
पुरस्कार पद्मश्री, संगीत अकादमी पुरस्कार
वडील नवनीत जोशी (कीर्तनकार)

ओंकार जोशी ऊर्फ मनोज नवनीत जोशी (जन्म : गोरेगांव, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, १ जून इ.स. १९५५) हे एक भारतीय चित्रपट अभिनेता व मराठी नाट्यकलाकार आहेत. मूळ गुजराती असलेल्या मनोज जोशी यांचे शिक्षण मराठीत झाले. त्यांचे वडील नारदीय कीर्तनकार होते. मनोज जोशी मुंबीतील भारती विद्या भवनमध्ये संस्कृत शिकले. त्यांनि प्रतिमा मुद्रण शास्त्रातला एक व्यावसायिक अभ्यासक्रम पुरा केला आहे. चित्रकला शिकून त्यांनी काही नियतकालिकांसाठी पृष्ठ मांडणीचे काम केले आहे. हे सर्व करीत असतानाच मनोज जोशी यांनी सत्यदेव दुबे, विजया मेहता, आणि शफी इनामदार यांच्यासारख्ह्या नाट्यकर्मींकडून नाट्यकलेचे मर्म आत्मसात केले.

त्याने मराठी, गुजराती, हिंदी, भोजपुरी चित्रपटांमधून अभिनय केला आहे. कांति मढियाच्या ताक धिना धिन या गुजराती नाटकात मनोजने १९८६ साली पहिली भूमिका केली. विवेक लागू यांचे सर्वस्वी तुझीच (१९९५) हे मनोज जोशी यांचे मराठीतले त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक. त्यानंतर मनोज जोषींनी अनेक मराठी, गुजराती, हिंदी, भोजपुरी आणि इंग्रजी नाटकांमधून भूमिका केल्या.

मनोज जोशी यांनी विजय तेंडुलकर यांचे ’घाशीराम कोतवाल’ हे नाटक गुजरातीत अनुवादित केले आहे.

मनोज जोशी हे तो दिवंगत अभिनेता राजेश जोशी याचा भाऊ आहे. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या दशक्रिया या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका केली आहे. १९९८पासून २०१७ पर्यंत त्यांनी ६०हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, त्यांतल्या बऱ्याचशा भूमिका विनोदी आहेत.

मनोज जोशी यांनी चाणक्य हे नाटक लिहायला १९८६पासून केली. चार वर्षे संशोधन, लेखन, भूमिकांची निवड वगैरे करून हे नाटक रंगभूमीवर आले. चाणक्याची मुख्य भूमिका मनोज जोशींनी केली होती.

चरित्र भूमिका ही मनोज जोशी यांची खास पसंती आहे.

गाजलेला डायलॉग : असतील असल्या बाया तर रात्र गेलीच वाया (नारबाची वाडी)

मनोज जोशी यांची भूमिका असलेली काही खास नाटके

  • कलापी (गुजराती)
  • गांधी विरुद्ध गांधी (मराठी आणि गुजराती)
  • डॉक्टर तुम्ही पण (मराठी आणि गुजराती)
  • मन मिले त्या मेलो
  • मनू ने मास्सी (गुजराती)
  • रंगीलो (गुजराती)
  • सगपणना सौदागर (गुजराती)
  • सूर्यवंशी (गुजराती)
भोपाळच्या आदि विद्रोही नाट्य समारोहात रवींद्र भवन येथे चाणक्याची भूमिका करताना जोशी - डिसेंबर २०१५

मनोज जोशी यांची भूमिका असलेले चित्रपट

वर्ष शीर्षक भूमिका भाषा
१९९९ SarfaroshSub-Inspector Bajju हिंदी
२००० Aaghaazas assistant of Danny Mendoza, Johnny's younger brother हिंदी
२००१ Jaaneman Jaaneman

Chandni Bar

Belji Bhai

Chandrakant Bhau

हिंदी
२००२ DevdasDwijdas Mukherjee हिंदी
२००३ HungamaSub-Inspector Waghmare हिंदी
२००३ Jogger's ParkTariq Ahmed हिंदी/इंग्रजी
२००४ Aan : Men at WorkManik Rao हिंदी
२००४ DhoomACP Shekhar Kamal हिंदी
२००४ JaagoAdvocate Satya Prakash Satwani हिंदी
२००४ HulchulLawyer हिंदी
२००५ Page 3Bosco हिंदी
२००५ ShikharAmrit Patil हिंदी
२००५ Kyon KiP.K. Narayan (A Security Guard) हिंदी
२००६ Phir Hera PheriKachara Seth हिंदी
२००६ Chup Chup KePooja's father हिंदी
२००६ Garam MasalaNageshwar हिंदी
२००६ Golmaal: Fun UnlimitedHarichandra Ramchandra Mirchindani "Harami" हिंदी
२००६ VivahBhagat Ji (Match maker of prem and poonam) हिंदी
२००६ Bhagam BhagMG Gandhi हिंदी
२००६ Humko Deewana Kar GayeRasikbhai Galgalia हिंदी
२००७ GuruGhanshyam Bhai हिंदी
२००७ Bhool BhulaiyaaBadrinath Chaturvedi हिंदी
२००८ Mere Baap Pehle AapChirag Rane हिंदी
२००८ Maan Gaye Mughal-e-AzamPolice Inspector Patil हिंदी
२००८ BilluDamodar Dubey हिंदी
२००८ KhallballiKK हिंदी
२००९ De Dana DanBrij Mohan Oberoi हिंदी
२०१० Maniben.comBhadresh Bhai हिंदी
२०१० Khatta MeethaTrigun Fatak हिंदी
२०११ Bin Bulaye BaraatiLoha Singh हिंदी
२०११ ReadyBharat Kapoor हिंदी
२०११ फक्त लढ म्हणा Marathi
२०११ The OpportunistThe Opportunist हिंदी
२०१२ Khiladi 786Champaklal हिंदी
२०१२ Dabangg 2Shopkeeper हिंदी
२०१२ गोळाबेरीज Story teller Marathi
२०१२ भारतीय Prime Minister Marathi
२०१३ ChalooChief Minister हिंदी
२०१३ PolicegiriJaveed Shiekh हिंदी
२०१३ Wake Up Indiaहिंदी
२०१३ नारबाची वाडी Double Role Marathi
२०१४ Mr Joe B. CarvalhoCommissioner Pandey हिंदी
२०१४ Hasee Toh PhaseeDevesh Solanki हिंदी
२०१४ Bey YaarY B Gandhi Gujarati
२०१५ Dolly Ki DoliDuby Ji हिंदी
२०१५ I Love New YearRandhir's friend हिंदी
२०१५ Kis Kisko Pyaar KaroonDeepika's father हिंदी
२०१५ Prem Ratan Dhan Payo Mr. Bhandari/Advocate of Pritampur Estate हिंदी
२०१६ Sanam ReAkash's Boss हिंदी
२०१६ Thai Jashe!Chandrakantbhai Joshi Gujarati
२०१६ Ghayal Once AgainMinister हिंदी
२०१७ Pappa Tamne Nahi SamjaayHasmukhlal Mehta Gujarati
२०१७ Tamburo (film)Kirit Bhai Gujarati
२०१७ दशक्रिया (चित्रपट)मराठी

दूरचित्रवाणी मालिका

वर्ष शीर्षक भूमिका भाषा
१९९० चाणक्यश्रीयक, शक्तारचा मुलगा हिंदी
१९९८ वहअमित हिंदी
१९९९ आभाळमायाशरद जोशी मराठी
१९९९–२००२ एक महल हो सपनों काAbhay Purshottam Nanavati हिंदी
२००० Your Honour
२००२ खिचडीहिंदी
२००२ कहेता है दिलमेयर साहेब हिंदी
२००४–२००५ ये मेरी लाइफ हैरसिक मेहता हिंदी
२००६ कसम सेनिशिकांत दीक्षित हिंदी
२०१५ चक्रवर्ती सम्राट अशोकचाणक्यहिंदी
२०१५–२०१६ होणार सून मी ह्या घरचीरमाकांत गोखले मराठी

शिवाय, एक महल हो सपनो का, राऊ (मराठी), संगदिल, कभी सौतन कभी सहेली वगैरे.

पुरस्कार

  • ITA Award for Best Actor in a Supporting Role (२०१६) चित्रपट - चक्रवर्ती अशोक सम्राट
  • कहता है दिल या चित्रपटातील नेगेटिव्ह भूमिकेसाठी Indian Telly Best Actor Award (२००३)
  • गुजरात सरकारकडून साबरकांठारत्‍न पुरस्कार (२०१४)
  • दशक्रियातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार (२०१७)
  • पद्मश्री (२०१८)
  • महाराष्ट्र राज्य व्यावसायिक गुजराती नाट्यस्पर्धेकडून सन्मान (१९९७)
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०१६)