मनीषा कोइराला
मनीषा कोइराला | |
---|---|
जन्म | १६ ऑगस्ट, इ.स. १९७० काठमांडू, नेपाळ |
इतर नावे | मनीषा कोइराला-दहल |
राष्ट्रीयत्व | नेपाळी |
कार्यक्षेत्र | अभिनय (चित्रपट) सामाजिक कार्य |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९८९ - चालू |
भाषा | नेपाळी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम |
पुरस्कार | फिल्मफेअर पुरस्कार |
पती | सम्राट दहल (इ.स. २००० -चालू) |
अधिकृत संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
मनीषा कोइराला (१६ ऑगस्ट, इ.स. १९७०; काठमांडू, नेपाळ - हयात) ही नेपाळी-भारतीय चित्रपट-अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्ती आहे. तिने हिंदी, नेपाळी, तमिळ, तेलुगू, मल्याळम चित्रपटांतून अभिनय केला आहे. तसेच ती भरतनाट्यम् व मणिपुरी अभिजात नृत्यशैल्यांमध्ये पारंगत आहे.
तिने इ.स. १९८९ साली फेरी भेटौला या नेपाळी चित्रपटातून पदार्पण केले. इ.स. १९९१ सालच्या सुभाष घई-दिग्दर्शित सौदागर या चित्रपटाद्वारे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. १९४२: अ लव्ह स्टोरी, बॉंबे, खामोशी: द म्यूझिकल व दिल से हे तिने भूमिका साकारलेले चित्रपट यशस्वी ठरले.
बाह्य दुवे
- "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2013-05-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-25 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मनीषा कोइराला चे पान (इंग्लिश मजकूर)