Jump to content

मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मध्य मार्गाचे दक्षिण मुंबईमधील टर्मिनस आहे.
नव्या लोकल गाड्या

मध्य हा मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबई मधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या मध्य भागातून धावतो. मुंबईची मध्य उपनगरे जोडणारा हा मार्ग ठाणे, डोंबिवली, कल्याण इत्यादी महत्त्वाच्या शहरांमधून धावतो. कल्याण येथे मध्य मार्गाचे दोन फाटे फुटतात. ईशान्य फाटा कसाऱ्यामार्गे नाशिककडे तर आग्नेय फाटा कर्जतमार्गे पुण्याकडे धावतो.

दादर आणि परळ रेल्वे स्थानक मध्य व पश्चिम दोन्ही मार्गांवर असल्यामुळे तेथे मार्ग बदलणे शक्य होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकुर्ला ह्या स्थानकांवरून हार्बर मार्गाद्वारे प्रवासाची सोय उपलब्ध आहे.

स्थानके

(जलद लोकल केवळ ठळक अक्षरांमधील स्थानकांवरच थांबतात.)

मुख्य मार्ग

# छशिमटपासून अंतर (किमी) स्थानक नाव स्थानक कोड
1छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसCSMT
2मशीद
3सँडहर्स्ट रोड
4भायखळा
5चिंचपोकळी
6करी रोड
7परळ
8दादरD
9११माटुंगा
10१३शीव
11१५कुर्लाC
12१८विद्याविहार
13२१घाटकोपरG
14२३विक्रोळी
15२५कांजुर मार्ग
16२६भांडुप
17२८नाहूर
18३२मुलुंड
19३४ठाणेT
20३६कळवा
21४०मुंब्रा
22४३दिवा जंक्शन
23४७कोपर
24४८डोंबिवलीDI
25५०ठाकुर्ली
26५३कल्याण जंक्शनK

मुख्य मार्ग फाटे

आग्नेय उपमार्ग

# स्थानक नाव स्थानक कोड
1कल्याण जंक्शनK
2विठ्ठलवाडी
3उल्हासनगर
4अंबरनाथA
5बदलापूरBL
6वांगणी
7शेलू
8नेरळ जंक्शन
9भिवपुरी रोड
10कर्जतS
11पळसधरी
12केळवली
13डोळवली
14लौजी
15खोपोलीKP

ईशान्य उपमार्ग

# स्थानक नाव स्थानक कोड
1कल्याण जंक्शनK
2शहाड
3आंबिवली
4टिटवाळाT
5खडवली
6वाशिंद
7आसनगावAN
8आटगाव
9तानशेत
10खर्डी
11उंबरमाळी
12कसाराN