मध्य प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे मध्य प्रदेशमधीलजबलपूरच्या जबलपूर रेल्वे स्थानक ते दिल्लीमधीलहजरत निजामुद्दीन स्थानकांदरम्यान आठवड्यातून तीनदा धावते. पश्चिम मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेसला जबलपूर ते दिल्ली दरम्यानचे ९०९ किमी अंतर पार करायला १४ तास लागतात.