मध्य दिल्ली जिल्हा
मध्य दिल्ली जिल्हा Central Delhi | |
दिल्ली केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा | |
देश | भारत |
केंद्रशासित प्रदेश | दिल्ली |
मुख्यालय | दर्यागंज |
तालुके | सिव्हिल लाईन्स, करोलबाग, दर्यागंज |
क्षेत्रफळ | |
- एकूण | २३ चौरस किमी (८.९ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | ५,७८,६७१ (२०११) |
-लोकसंख्या घनता | २३,१४९ प्रति चौरस किमी (५९,९६० /चौ. मैल) |
-शहरी लोकसंख्या | ९८.०२% |
-साक्षरता दर | ८५.२५% |
-लिंग गुणोत्तर | ८९२ ♂/♀ |
संकेतस्थळ |
मध्य दिल्ली (सेंट्रल दिल्ली) हा भारतातील राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीच्या ११ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा पूर्वेला यमुना नदीने आणि उत्तरेला उत्तर दिल्ली, पश्चिमेला पश्चिम दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्ली, दक्षिणेला नवी दिल्ली या जिल्ह्यांनी वेढलेली आहे. प्रशासकीयदृष्ट्या, जिल्हा सिव्हिल लाइन्स, करोल बाग आणि कोतवाली, दिल्ली या तीन उपविभागांमध्ये विभागलेला आहे.
मुघल साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण जुनी दिल्ली (शहाजहानाबाद) ह्याच जिल्ह्यात आहे. तसेच जामा मशीद ही दिल्लीमधील सर्वात मोठी मशीद व लाल किल्ला ह्याच जिल्ह्यात आहे.
प्रमुख ठिकाणे
- चांदणी चौक
- दर्यागंज
- करोल बाग
- शास्त्रीनगर
- पहाडगंज
- राजेंद्र नगर
लोकसंख्या
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, जिल्ह्याची लोकसंख्या ५,७८,६७१ आहे, ज्याचे प्रमाण ८९२ स्त्रिया आणि १००० पुरुष आहेत. साक्षरता दर ८५.२५% आहे. २००१-२०११ या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर −१०.४८% होता.[१]
लोकसंख्येच्या १,९७,१२३ (२२.०४%) अनुसूचित जाती आहेत. जिल्ह्यात, ८५.०५% लोकसंख्या हिंदी, ४.२७% पंजाबी, ३.५९% उर्दू, १.१६% भोजपुरी आणि १.०५% बंगाली भाषा बोलतात.[३]
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ "District Census Handbook: NCT Delhi" (PDF). censusindia.gov.in. Registrar General and Census Commissioner of India. 2011.
- ^ "Table C-01 Population by Religion: NCT Delhi". censusindia.gov.in. Registrar General and Census Commissioner of India. 2011.
- ^ a b "Table C-16 Population by Mother Tongue: NCT Delhi". www.censusindia.gov.in. Registrar General and Census Commissioner of India.