मध्यम मार्ग
बौद्ध धर्म |
---|
मध्यम मार्ग किंवा मध्य मार्ग (पाली: मज्झीमापतिपदा; संस्कृत: मध्यमाप्रतिपदा) ही एक बौद्ध धम्मातील संज्ञा आहे. गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्गाचे वैशिष्ट्य वर्णन करण्यासाठी या संज्ञेचा वापर केला. ज्याद्वारे निर्वाण पदाला माणूस पोहचतो.
गौतम बुद्धांचा मध्यम मार्ग
तथागत गौतम बुद्ध यांनी मानवी मनाच्या सामर्थ्याचा अचुक वेध घेताना मानवी मनाच्या सामर्थ्याची भरारी किती मोठी आहे हे त्यांनी अचुक ओळखले. तसेच कर्म हे नैतिक व्यवस्थेचे आधार असल्याने आणि ते कम्म मानवाकडुनच होत असल्याने आणि मानवाची आकलन शक्तीही मोठी असल्याने, नैतिकव्यवस्थेत त्यांनी मानवाला केंद्रबिंदु ठेवुन नियतीच्या हातातील भवचक्र मानवाच्या हाती दिले.एवढेच करून तथागत थांबले नाहीत तर, दुःख मुक्तीचा मार्ग देताना त्यांनी समस्त मानव जातीवर उपकारच केले आहेत. परंतु मानव हा कृतघ्न व स्वार्थी असल्याने तथागतांना तो ओळखु शकला नाही किंबहुना मानवाला तथागतांचा मध्यम मार्गच समजला नाही.
तथागत भगवान गौतम बुद्धांनंतर संघाकडे धम्माचा वारसा आला.तदनंतर धम्मदायाद सम्राट अशोक यांनी हया धम्माला अटकेपार भारतीय सीमारेषे पलीकडे नेले.सम्राट अशोका नंतर त्यांचा नातु बृहद्रथ येथ पर्यंत हा धम्म सुरक्षीत होता परंतु जेव्हा बृहद्रथ याची हत्या करून पुष्पमित्र शुंग मगधच्या गादीवर आल्यावर त्याने बौद्ध भिक्खुंची कत्तल करण्यास सुरुवात केली.त्यामुळे धम्म हा धम्म राहिला नाही अन् बौद्ध धम्माला उतरती कळा लागली.तदनंतर मुस्लिम आक्रमणे तसेच हिंदुंनी केलेली तोडफोड यामुळे बौद्ध धम्माचे अधःपतन झाले.त्यानंतर हा धम्म भारतात फक्त नावाला उरला होता किंवा तेही नाव पुसले गेले होते.जेव्हा बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि केळुस्कर गुरुजींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध चरीत्र हे पुस्तक भेट म्हणुन दिले. तेव्हापासून बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना या धम्मावीषयी गोडी वाटु लागली आणि जेव्हा येवले मुक्कामी त्यांनी जी भिष्म प्रतिज्ञा केली माझा जन्म जरी हिंदू धर्मात झाला असला तरी, मी हिंदू धर्मात मरणार नाही. आणि ही भिष्म प्रतिज्ञा त्यांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपूर येथे पत्नी समवेत स्वतः भदंत चंद्रमणी यांच्या कडुन बौद्ध धम्माची दिक्षा घेउन पुर्ण केली त्यावेळेस त्यांच्या समवेत असलेल्या सुमारे पाच लक्ष अनुयांयांनाही बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दिक्षा दिली अन् म्हणले प्रत्येक दरेकाने दरेकास धम्म दिक्षा दयावी.परंतु बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माची दिक्षा देऊन काही काळ उलटला नसेल तर त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. म्हणजेच या धम्माला जन्म देऊन या धम्माची माय आपणास सोडुन गेली ,आपण पोरके झालो.आपल्याला हा धम्म फारसा त्यांच्या कडुन निट अदयाप समजलेलाच नाही. याबाबीने आपली म्हणावी तितकी प्रगती होत नाही या बाबीला ना तथागत भगवान गौतम बुद्ध जबाबदार आहेत, ना बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जबाबदार आहेत या बाबील सर्वस्वी आपण जबाबदार आहोत आपण या धम्माचे आकलन केले पाहीजे.या धम्माला जाणले पाहीजे, या धम्माला ओळखले पाहीजे. अन् या धम्मानुसार वागले पाहीजे तरच प्रगती पथावर आपण आरूढ होऊ.
बौद्ध बांधवांनी दर रविवारी बुद्ध विहारात गेले पाहीजे.बुद्ध विहारातुन या धम्माचे आकलन केले पाहीजे.धम्म समजावुन घेतला पाहीजे आणि या धम्मानुसार आचरण केले पाहीजे यासाठी बुद्ध विहारे आहेत. तेथे ज्यांनी या धम्माचा अभ्यास केला आहे त्यांच्या कडुन या धम्माच्या चाली रिती शिकल्या पाहीजेत.तरच आपण आपल्याला बौद्ध म्हणु शकु आज जर आपणासच हा धम्म कसा आहे हे जर फारसा निट समजलाच नाही तर पुढील पिढीस तो कसा काय कळेल ?
सर्वात प्रथम आपण विहारातुन पंचांग प्रणाम कसा करावयाचा ते शिकुन घेऊ तदनंतर भंते यांजकडुन क्षमा याचना आणि शिल ग्रहण करू.तेच शिक्षण आपण आपल्या मुलांना देवुन त्यांना आपण बौद्ध असल्याचे त्यांच्या मनावर बिंबवु.मग पुढील बाबींचा आपण विचार करू अन् तो म्हणजे तथागत गौतम बुद्धांचा मध्यम मार्ग तेव्हा, आपणास बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मा विषयी दिलेला अमूल्य असा ग्रंथ ‘‘बुद्ध आणि त्यांचा धम्म हा वाचुन समजुन उमजुन घेऊ. तथागत गौतम बुद्धांना जेव्हा सम्यक ज्ञानाची प्राप्ती झाली तेव्हा सर्वात प्रथम आपण कोणाला उपदेश करावा या उदात्त हेतुने त्यांनी सारनाथ येथील मृगदायनवनात पंचवर्गीय भिक्खुना पहिले प्रवचन दिले.त्यात त्यांनी तपश्चर्येला नकार देत म्हणले जिवनाची आत्यंतीक अशी दोन टोके आहेत.एक सुखोपभोगाचे तर दुसरे आत्मक्लेशाचे म्हणजेच खडतर तपश्चर्येचे होय.एक म्हणतो खा,प्या,मजा करा कारण उदया आपण मरणारच आहोत.तर दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका कारण त्या पुर्वजन्माचे मूळ आहेत.हे दोन्हीही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे आहेत.म्हणुनच ते तथागतांनी नाकारले.तथागतांनी जास्त सुखोपभोगाचाही आणि जास्त आत्मक्लेशाचाही मार्ग न घेता यातुन सुवर्णमध्य काढताना मधला मार्ग अवलंबीला.ज्याला पाली भाषेत ‘‘मज्जिम पतिपद’ असे म्हणतात.जो पर्यंत मानवाचे स्वत्व कार्यप्रवृत्त असते आणि त्याला ऐहिक व परलौकिक भोगाची अभिलाषा असते तो पर्यंत त्यानी केलेले आत्मक्लेश,खडतर तपश्चर्या ही व्यर्थच आहे.आत्मक्लेशाच्या मार्गाने जर आपला कामाग्नी शांत करू शकत नाही तरआत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगुन आपण स्वतःला कसे काय जिंकू शकू ? जेव्हा आपण स्वतःवर विजय मिळवु तेव्हाच कामतृष्णे पासून आपण मुक्त होऊ. मग तूम्हाला ऐहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलीन विकार निर्माण होणार नाहीत.तूमच्या शाररिक गरजांनुसार तूम्ही खा,प्या.
सर्व प्रकारची विषयासक्ती ही नेहमीच उत्तेजीत असते.विषयासक्त मनुष्य हा कामवासनांचा गुलाम बनतो.सर्व प्रकारची सुखआसक्ती अधःपतन करणारी व नीच कर्म करणारीच असते. तथापि जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पुर्तता करणे ही वाईट गोष्ट नाही.शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्त्यव्य आहे त्याच्याशिवाय तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवु शकणार नाहीत.आणि प्रज्ञाही जागृत करू शकणार नाहीत.
उपरोक्त अशी ही दोन टोके आहेत की, माणसाणे त्याचा कधिही अवलंब करू नये.एक टोक म्हणजे ज्या गोश्टीचे आकर्शण कामतृष्णेमुळे होते. अशा गोष्टीत आणि विशेशतः अशा विषयासक्तीत फार काळ डुंबुन राहुन तृप्ती मिळविण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा, रानटीपणाचा, अयोग्य आणि हानीकारक आहे.तर, दुसरे टोक म्हणजे आत्मक्लेश किंवा तपश्चर्या हा मार्ग देखील दुःखदायक,अयोग्य आणि हानीकारक आहे.हि दोन्ही टोके टाळुन असा एक मध्यम मार्ग आहे त्याच मार्गाचा माणसाणे विचार केला पाहीजे,त्याच मार्गाची माणसाणे निवड केली पाहीजे, त्याच मार्गावर माणसाणे आरूढ झाले पाहीजे.या मार्गालाच धम्म असेही म्हणता येईल त्याचा ईश्वर अथवा आत्म्याशी काहीही कर्त्यव्य नाही.त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही.तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशी काडीचाही संबंध नाही. माणुस आणि माणसाचे माणसाशी या जगातील असलेले नाते हाच तर या धम्माचा केंद्रबिंदु आहे.आपल्या धम्माचे हे पहीले अधिष्ठान आहे.
मनुष्यप्राणी हा दुःखात,दैन्यात आणि दारिद्रयात राहत आहे हे त्याचे दुसरे तत्व होय.हे सर्व जग दुःखाने भरलेले आहे,आणि हेच दुःख जगातुनच नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्येश आहे.यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही.या धम्माचा पाया म्हणजे दुःखाचे अस्त्ति्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच तर खरा या धम्माचा पाया आहे.या धम्माच्या माध्यमातुन दुःख कसे नाहीसे होते ते पहावयाचे झाल्यास आपण ,
प्रत्येकाने या धम्मानुसार 1) पवित्र असा विशुद्धीचा मार्ग अनुसरला पाहीजे 2) सदाचरणाचा मार्ग स्वीकारला पाहीजे.3) शील मार्गाचे अवलंबन केले पाहीजे
1) पवित्र असा मार्ग अनुसरणे म्हणजेच चांगल्या जीवनाची पाच तत्वे स्वीकारणे
1.1) कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे
1.2) चोरी न करणे किंवा दुस-याच्या मालकीची वस्तु न बळकावणे.
2.3) व्यभिचार न करणे
2.4) असत्य न बोलणे
2.5) मादक पदार्थाचे सेवन न करणे.यालाच पंचशील असेही म्हणतात तर दुस-या भाषेत याला विशुद्धी मार्ग असेही म्हणतात या पवित्र मार्गाचे अनुसरण करणे हे समस्त मानवजातीस आणि सर्व समाजास लाभदायकच आहे.
2) सदाचरणाचा मार्ग :- यालाच बुद्ध धम्मात अष्टांगिक मार्ग असेही म्हणले जाते.
2.1) सम्यक दृष्टी : - माणसाला दुःखाचे अस्तित्व आणि दुःखनिरोधाचा ही उदात्त सत्ये न समजणे म्हणजेच
अविदया होय या अविदयेचाच नाश म्हणजेच सम्यकदृष्टी होय.निसर्गनियमना विरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ
शकते ही गोष्ट माणसाणे मानली नाही पाहीजे.कर्मकांड न करणे शास्त्रावरील मिथ्या विश्वास टाकुन देणे.
2.2) सम्यक संकल्पना :- माणसाला ध्येय,आकांक्षा आणि महत्वकांक्षा असते ती उदात्त आणि उच्च अशी
प्रशंसनीय असावी यालाच सम्यक संकल्पना असे म्हणतात.
2.3) सम्यक वाचा :- सत्य बोलणे, असत्य बोलु नये.दुस-याविषयी वाईट बोलु नये,निंदा नालस्ती करू
नये,रागाची किंवा शिवीगाळाची भाषा वापरू नये,सर्वांशी आपुलकीने आणि सौजन्याने बोलावे,अर्थहिन
अथवा वायफळ मुर्खपणाची बडबड करू नये.बोलणे नेहमी समंजसपणाचे व मुद्येसुद असावे.
2.4) सम्यक कर्मांत :- योग्य वर्तनाची शिकवण देते.
2.5)सम्यक आजिविका :- चरीतार्थ चालविण्यासाठी जे जे,जे चांगले मार्ग आहेत ते निवडणे म्हणजेच दुस-यांची
हानी न करता,त्यांच्यावर अन्याय न होता जगण्यापुरते मिळविण्याचे जे चांगले मार्ग आहेत त्यालाच सम्यक
आजिविका असे म्हणतात.
2.6)सम्यक व्यायाम :- अविदया नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय.दुःखदायक कारागृहातुन बाहेर पडुन
पुढील मार्ग मोकळा करणे.त्याचे चार हेतु आहेत.अ) अष्टांग मार्गाच्या विरोधी चित्तप्रवृत्तीचा निरोध करणे.
ब) अशा प्रकारच्या ज्या चित्तप्रवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्या दाबुन टाकणे.
क) अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तप्रवृत्ती उत्पन्न करणा-या माणसाला साहाय्य करणे
ड) अष्टांग मार्गाला पोषक अशा प्रकारच्या चित्तप्रवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील तर त्यांची
वाढ आणि विकास करणे हे चार हेतु आहेत
2.7) सम्यक स्मृती :- दुष्ट वासनांवर मनाचा सतत पहारा ठेवणे.
सदाचरणाच्या या सात मार्गावर आरूढ झालेल्या मानवाच्या मार्गात हे पाच अडथळे येतात 1)लोभ 2) व्देष
3) आळस किंवा सुस्ती 4) संशय 5) अनिश्चय हे पाच अडथळे केवळ चित्ताची एकाग्रतेने पाच अडथळे दुर
करता येतात ती स्वयंप्रेरीत अशा ध्यानमार्गावरून ती आपल्याला साधता येते.यालाच सम्यक समाधी असे
म्हणतात
2.8) सम्यक समाधी :- सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टींचा विचार करावयाला व चांगल्याच गोष्टींचाच
नेहमी विचार करण्याची सवय लावते.त्यामुळे मनामध्ये चांगल्याच कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा
निर्माण करते.
3) शील मार्गाचे अवलंबन करणे :- पुढील सद्गुणांचे पालन करणे होय.
3.1) शील :- शील म्हणजे नितीमत्ता वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोश्टी करण्याकडे असलेला मनाचा कल
3.2) नैश्क्रम्य :- म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग
3.3) दान :- स्वार्थाच्या किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुस-याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता,रक्त आणि देह अर्पण करणे इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे.
3.4) वीर्य :- हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.
3.5).शांती :- शांती म्हणजे क्षमाशीलता, व्देशाला व्देशाने न शमविता ते प्रेमाने शमविणे.
3.6) सत्य :- सत्य म्हणजे खरे,नेहमी सत्यच बोलणे
3.7) अधिष्ठान :- ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय
3.8) करुणा :- मानवाविषयीची प्रेमपूर्णदयाशीलता
3.9) मैत्री :- सर्व प्राण्याविषयी,मित्रांविषयीच नव्हे तर,शत्रुविषयी देखील, मनुष्यप्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जिवमात्राविषयी बंधुभाव बाळगणे
3.10) उपेक्षा :- औदासीन्याहुन निराळी अशी अलिप्तता,अनासक्ती होय.फलप्राप्तीने विचलीत न होणे.म्हणजेच निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे.म्हणजेच उपेक्षा
या आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणांचे पालन केले पाहीजे यालाच पारमिता असे म्हणतात.
प्रत्येकाने या धम्मानुसार 1) पवित्र असा विशुद्धी मार्ग 2) सदाचरणाचा मार्ग आणि 3) शील मार्गाचे अवलंबन करणे म्हणजेच तथागत गौतम बुद्धांच्या धम्मावरील मध्यम मार्गाचे अनुसरण,आचरण करणे होय. हे प्रत्येक मानवजातीने एका पिढीकडुन दुस-या पिढीकडे याचे लोण पोहचविल्यास मानवाकडुन कुशल कम्मच होतील आणि जर,मानवाने अशा प्रकारे कुशल कम्म केल्यास नैतिकव्यवस्थाही कुशल होवुन सारी मानवजात, प्राणीमात्र सुखीक्षेमी आनंदी होतील. तसेच धम्म हा धम्म न राहता सद्धम्म होईल.
थेरवाद बौद्ध आणि पाली सिद्धांत
धम्मचक्कप्पवत्तन सुत्त
थेरवादी बौद्ध धम्मातील पाली साहित्यातील धम्मचक्कप्पवत्तन सुत्तात (धम्मचक्रचक्र प्रवर्तन सूत्र) मध्यम मार्ग संज्ञेचा वापर करण्यात आलेला आहे. बौद्ध परंपरेनुसार ज्ञान प्राप्ती नंतर दिलेल्या प्रवचनात याचा समावेश होतो.[a] बौद्ध सुत्तात, बुद्धाने अष्टांगिक मार्ग संवेदना आणि संवेदनहीनता आणि आत्म-उन्नती यांच्यासाठी मध्यम मार्ग उपकारक आहे, असे सांगितले आहे.[१]
तथागत बुद्धांच्या मते, जीवन व प्रसंगातील चढाओढांपासून दूर राहण्यासाठी मध्यम मार्ग परिपूर्ण स्रोत आहे. जो दृष्टी, ज्ञान, आणि शांती प्रदान करतो आणि तो मार्ग निब्बाणाकडे जातो. तथागतांच्या मते मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग होय.
- अष्टांगिक मार्ग खालिलप्रमाणे आहेत
- सम्यक् दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.
- सम्यक् संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.
- सम्यक् वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.
- सम्यक् कर्मान्त :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
- सम्यक् आजीविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
- सम्यक् व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.
- सम्यक् स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.
- सम्यक् समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.
याचे आचरण म्हणजेच मध्यम मार्ग आचरण होय.[२]
अवलंबित उत्पत्ति
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.