Jump to content

मधुकर सरपोतदार

मधुकर सरपोतदार (जानेवारी ३१, इ.स. १९३६ - फेब्रुवारी २०, इ.स. २०१०) हे मराठी राजकारणी होते. ते शिवसेनेचे नेते होते. शिवसेनासदस्य असताना ते महाराष्ट्र विधानसभेवरलोकसभेवर निवडून गेले होते.

राजकीय कारकीर्द

सरपोतदार इ.स. १९९० साली महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते. ते इ.स. १९९६इ.स. १९९८, असे दोन वेळा वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडले गेले. त्यांनी लोकसभेतील शिवसेना संसदीय गटनेतेपदही सांभाळले.