मधुकर धर्मापुरीकर
मधुकर धर्मापुरीकर हे मराठीतले एक लेखक आहेत. त्यांचा जन्म १९५४ साली नांदेड जिल्ह्यातल्या कंधार गावी झाला. ते नांदेड जिल्हा परिषदेतून वरिष्ठ लेखाधिकारी म्हणून २००७ साली निवृत्त झाले. १९७६पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कथालेखनासोबत व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने त्यांनी विपुल लेखन केले.
मधुकर धर्मापुरीकर यांची प्रकाशित पुस्तके
- अचंब्याच्या गोष्टी – कथासंग्रह
- अनकॉमन मॅन : आर. के. लक्ष्मण
- अप्रूप – कथासंग्रह.
- आलटून पालटून – कथासंग्रह
- आर. के. नारायण यांच्या ‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्स’ या दोन पुस्तकांचा मराठीत अनुवाद.
- गीतमुद्रा – संगीतविषयक लेख
- गोष्टीवेल्हाळ – कथासंग्रह
- चिनकुल - लघुतम कथासंग्रह
- जानिब-ए-मंजिल (गझलसंग्रह)
- झाली लिहून कथा? (मॅजिस्टिक प्रकाशन)
- डिप्टी कलक्टरी - अनुवाद आणि अनुभव
- पारख – कथासंग्रह
- पिता-पुत्र : नाते आणि अंतर (संपादित)
- बाधा – कथासंग्रह
- मालगुडी डेज् (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - आर.के. नारायण)
- मिळून मिसळून
- रूप – कथासंग्रह
- रेषालेखक वसंत सरवटे (चरित्र – राजहंस प्रकाशन; सहसंपादक दिलीप पाडगावकर)
- विश्वनाथ – कथासंग्रह
- सुपरहिरो आर.के. लक्ष्मण (चरित्र)
- स्वामी ॲन्ड फ्रेंड्स (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - आर.के. नारायण)
- हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडे (सदरलेखन संग्रह; मॅजिस्टिक प्रकाशन)
मधुकर धर्मापुरीकर यांना मिळालेले पुरस्कार
- ‘अनकॉमन मॅन : आर. के. लक्ष्मण’साठी महाराष्ट्र सरकारचा २०१६ सालचा पुरस्कार; २०१७ सालचा ना.धों. ताम्हनकर पुरस्कार.
- अप्रूपसाठी – महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार.
- 'झाली लिहून कथा'साठी महाराष्ट्र सरकारचा दिवाकर कृष्ण लघुकथा लेखनाचा पुरस्कार (२०१७)
- वसंत गाडगीळ पुरस्कार.
- विश्वनाथसाठी – महाराष्ट्र साहित्य परिषदेचा व इचलकरंजीच्या आपटे वाचनमंदिराचा पुरस्कार.