Jump to content

मतिमंदत्व पातळ्या

मतिमंदत्वामध्ये विचारक्षमता ही मानसिक वयामध्ये मोजली जाते

मतिमंदतेचे सामन्यता चार वर्ग आहेत

  • सौम्य
  • मध्यम
  • गंभीर
  • अतिगंभीर.

मतिमंदत्वाचे वर्ग हे कार्यात्मक पातळीवर अवलबून असतात.

सौम्य मतिमंदता ७० ते ७५

मतिमंदता असणा-या लोकांमध्ये सरासरी ८५ टक्के लोकांमध्ये सौम्य पद्धतीची मतिमंदता असते. त्यांचा आयक़्यू स्कोअर ७० ते ७५ पर्यंत असतो, आणि ते बहुदा सहावी इयत्ते पर्यंतचे सिद्धांत विषयक कुशलता प्राप्त करतात. ते पुरेसे आत्मनिर्भर होतात आणि काही मामल्यांमध्ये सामाजिक आणि सामुहिक आधारात स्वतंत्र राहू शकतात. सौम्य मतिमंदत्व असणाऱ्या व्यक्तींचे सामाजिक समायोजन किशोरवयीन मुलामुलीन इतकेच असते परंतु किशोर वयीन मध्ये असणाऱ्या कल्पना शक्ती शोधक वृत्ती व मूल्य मापन क्षमता या गोष्टी कमीच आढळतात

मध्यम मतिमंदता ३५ ते ५५

मतिमंदता असणा-या लोकांमध्ये अंदाजे १० टक्के लोकांमध्ये मध्यम पद्धतीची मतिमंदता असते. मध्यम पद्धतीचा मतिमंदता असणा-या लोकांमध्ये आयक़्यू स्कोअर ३५ ते ५५ असतो. ते मध्येम देखभाल मध्ये आपले काम आणि आत्म देखरेख करू शकतात. ते बालपणात विशिष्ट संवाद कुशलता प्राप्त करतात आणि समाजात, देखरेखीखाली, समूह घरात राहून कार्य करू शकतात. मोठे पणी या मुलांची बौद्धिक क्षमता ४ ते ७ वर्ष वयाच्या मुलांना इतकी असते

गंभीर मतिमंदता २० ते ४०

मतिमंदता असणा-या लोकांमध्ये अंदाजे ३ ते ४ टक्के लोक अति प्रमाणात मतिमंदता असलेले असतात. त्यांचा आयक़्यू स्कोअर २० ते ४० असतो. ते अगदी प्राथमिक आत्म-देखरेख आणि संवाद कुशलतेत निपुण होऊ शकतात. गंभीर प्रमाणात मतिमंदता असलेल्या व्यक्ती समूह घरात राहू शकतात. कधी कधी याला अवलंबी मतिमंदत्व म्हणतात या व्यक्तींचा स्नायविक व वाचिक विकास मागे पडलेला असतो तसेच वेदन इंद्रिय मध्ये देखील कान डोळे यात दोष आढळतो

अतिगंभीर मतिमंदता २०ते२५

जीवन भर या लोकांना दुसऱ्याची आधाराची गरज असते या व्यक्तीन मध्ये जूळवून घेण्याच्या क्षमतेचा विकास झालेला नसतो या गटातील व्यक्तींना फेफरे येणे बहिरेपणा मुकेपणा इत्यादी विकार असू शकतात तसेच शारीरिक व्यंग्य मज्जासंस्था विकृती खुंटलेली वाढ ही लक्षणे दिसतात मतिमंदता असणा-या लोकांमध्ये फक्त १ ते ३ टक्के अतिगंभीर प्रमाणात मतिमंदता असलेले असतात. त्यांचा आयक़्यू स्कोअर २० ते २५ असतो. यांना योग्य आधार आणि प्रशिक्षणाने त्यांना अगदी प्राथमिक स्वताची देखरेख आणि संवाद कुशलता प्राप्त होऊ शकते. त्यांची मतिमंदता बहुदा मेंदूसंबंधीच्या (न्यूरोलोजिक) अव्यवस्थतेमुळे होते. गंभीर प्रमाणात मतिमंदता असलेल्या लोकांना उच्च स्तराचे संरचना आणि देखभाल आवश्यक आहे.

मतिमंदता होण्याची कारणे

प्रसव पूर्व

  • गुणसूत्र-संबंधी दोष :-
      १ डाउन्स सिंड्रोम, 
      २ फ्रजाईल एक्स सिंड्रोम,
      ३ प्राडर विली सिंड्रोम,
      ४ क्लिनफेल्टर्स सिंड्रोम

• सिंगल जीन डिसऑर्डर:-

      जन्मजात चयापचय प्रक्रिया (metabolism) मध्ये दोष असणे 
      उदा. 
      १ गॅलेक्टोसेमिया,
      २ फिनिलकिटोन्यूरिया, 
      ३ हायपोथायरॉयडिजम, 
      ४ म्यूको पॉलीसॅकरायडॉसिस,
      ५ टे सॅक्स डिसीज.

• न्यूरो क्यूटॅनियस सिंड्रोम:-

      ट्यूबरस स्क्लेरॉसेस,
      न्यूरो फायर्बोमॉटोसिस

• डिसमॉर्फिक सिंड्रोम:-

      लॉरेंस बेडिल सिंड्रोम

• मेदूची विकृत रचना-:

      मायक्रोसिफॅली,
      हायड्रोसिफॅलस, 
      माइलो मेनिंगोसिले


आईच्या असाधारण परिस्थितीचे परिणाम मुळे

अभाव

आयोडीनची कमतरता आणि फोलिक ऑसिडची कमतरता, गंभीर कुपोषण • पदार्थांचा वापर: मद्य, निकोटीन, कोकेन • हानिकारक रसायनांशी संपर्क येणे: प्रदूषक पदार्थ, जड धातू, हानिकारक औषधे उदा. थॅलिडोमाईड, फिनिटोइन, वारफॅरिन, सोडियम, इ. • मातेला असलेले संसर्गजन्य रोग: रुबेला, टोक्सोप्लासमोसिस, सायटोमेगॅलोवायरस संक्रमण, सिफिलिस, एच आय वी • रेडिएशन (आण्विक प्रारण) शी संपर्क येणे आणि Rh विसंगती • गर्भारपणातील गुंतागुंती: गर्भावस्थेमुळे प्रेरित उच्च रक्तदाब, गर्भावस्थेत झालेले रक्त स्राव, नाळीचे काम नीट न चालणे • मातेला असलेले रोग: मधुमेह, ह्रदय रोग आणि मूत्रपिंडाचे रोग.

प्रसूतीच्या वेळेस

      १ कठीण आणि/ किंवा गुंतागुंतीची प्रसूती, 
      २ वेळेच्या फारच आधी प्रसूती होणे,
      ३ जन्माच्या वेळेस बाळाचे वजन खूप कमी असणे
      ४ प्रसूतीच्या वेळेस प्राणवायू कमी पडणे
      ५ प्रसूतीच्या वेळेस बाळाला इजा होणे.

• जन्मानंतरचे दिवस:

      सेप्टीसेमिया, 
      पांडुरोग
      हायपोग्लायसेमिया
      नवजात शिशूला झटके येणे

• शैशत्व आणि बालपण:

      मेंदुचे रोग 
      उदा. क्षयरोग, 
           जॅपेनीज एनसिफलाइटीज 
           जीवाण्विक मस्तिष्क ज्वर (मेनिंजायटिज) डोक्याला आघात
           शिसे धातूशी दीर्घकालीन संपर्क येणे
           गंभीर आणि दीर्घकालीन कुपोषण
           खूप कमी उत्तेजना असने
मतिमंदतेची लक्षणे

• बालपणातच बौद्धिक विकासाची चिन्हे दाखवण्यात असफल होणे • विकासाची सूचक लक्षणे उदा. वेळेवर बसणे, रंगणे, चालणे, किंवा बोलणे इ. क्रिया न दिसणे • बालिश वागणूक चालूच राहणे बोलण्याच्या शैलीमध्ये, किंवा सामाजिक नीतिनियम आणि स्वतःच्या वागणुकीचे परिणाम समजण्यात असफल होणे • कुतूहल नसणे आणि समस्यानिवारण न करता येणे • शिकण्याची क्षमता आणि तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता कमी असणे • विषय आठवण्यास त्रास होणे • शाळेला जाण्यासाठी आवश्यक बाबी पूर्ण न करू शकणे

उपचार • मतिमंदतेवरचे उपचार हे विकार पूर्णपणे बरा करण्यासाठी योजलेले नसतात.

      परंतु उपचार हे धोके कमी करण्या साठी असतात 
      उदा. एखाद्या व्यक्तीला घरी किंवा शाळेत सुरक्षित राहण्यास मदत करणे
      आणि उपयुक्त व अनुरूप जीवन शैली शिकवणे. 
      व्यक्तीच्या आणि त्यांच्या परिवाराच्या विशिष्ट गरजांवर अवलंबून असायला पाहिजे.
      व्यक्तीचे सामर्थ्य जास्तीत जास्त वाढणे हे त्याचे मूलभूत उद्दिष्ट असले पाहिजे.

• याबरोबर आणखी काही व्याधी

      उदा. आक्रमकता,
      मनाचा कल बदलणे, 
      स्वतःला हानीकारक असेल असे वागणे,
      वर्तणुकीच्या इतर समस्या,
      झटके येणे जे ४०% ते ७०% प्रकरणांमध्ये दिसते, यासाठी औषधोपचार आवश्यक आहे.