मतदान केंद्र
सामान्यपणे,मतदान केंद्र म्हणजे मतदाराला जेथे जाऊन मतदान करावे लागते ती जागा असते. मतदान केंदाची निश्चिती निवडणूक अधिकारी करतो. वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेगवेगळी नेमून दिलेली मतदान केंद्रे असतात. साधारणपणे हे बघण्यात येते कि मतदारास त्याचे नेमून दिलेले मतदान केंद्रावर पोचण्यास त्रास होऊ नये व हे अंतर त्यांचे साधारण निवासस्थानापासून लांब असू नये.
मतदार केंद्रांची 'संवेदनशिलता' बघुन त्याठिकाणी आवश्यक त्या स्तराची सुरक्षा पुरविण्यात येते. मतदान केंद्राचे बाहेर काही विशिष्ट माहिती प्रदर्शित करण्यात आलेली असते. ती मतदाराला मतदान करण्यास पुरक अशी असते.
मतदान केंद्राचा प्रमुख मतदान अधिकारी असतो व त्याचे दिमतीस अजून व्यक्ति असतात. निवडणुकीच्या प्रक्रियेत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत अशी खबरदारी त्याला घ्यावी लागते.भारतात साधारणतः शासकीय कर्मचारीच निवडणुकीच्या कार्यात घेण्यात आलेले असतात.
मतदान केंद्रात मतपेटी किंवा मतदान यंत्राची व्यवस्था केलेली असते. तेथे जाऊन आवश्यक ती प्रक्रिया पार पाडून मतदार आपले मतदान करू शकतो.