Jump to content

मक्का

मक्का
مكة
सौदी अरेबियामधील शहर
मक्का is located in सौदी अरेबिया
मक्का
मक्का
मक्काचे सौदी अरेबियामधील स्थान

गुणक: 21°25′21″N 39°49′24″E / 21.42250°N 39.82333°E / 21.42250; 39.82333

देशसौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
प्रांत मक्का
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ५१४
क्षेत्रफळ ७६० चौ. किमी (२९० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९०९ फूट (२७७ मी)
लोकसंख्या  
  - शहर १५,७८,७२२
  - घनता १,३०० /चौ. किमी (३,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०३:०० (अरबी प्रमाणवेळ)
http://holymakkah.gov.sa/


मक्का (अरबी: مكة) हे सौदी अरेबिया देशातील मक्का प्रांताची राजधानी व एक प्रमुख शहर आहे. इस्लाम धर्माचा संस्थापक मुहंमद पैगंबर ह्याचे जन्मस्थान असलेले मक्का इस्लाम धर्मामधील सर्वात पवित्र स्थळ मानले जाते. दरवर्षी हज यात्रेच्या निमित्ताने मक्केला कोट्यावधी मुस्लिम भेट देतात. कुराणानुसार आयुष्यात एकदा तरी हज यात्रेदरम्यान येथील अल-हरम मशीदीमधील काबा ह्या वास्तूचे दर्शन घेणे प्रत्येक मुस्लिम धर्मीय व्यक्तीसाठी बंधनकारक मानले जाते.

मक्का शहर जेद्दाह पासून ७० किमी अंतरावर स्थित असून २०१५ साली येथील लोकसंख्या सुमारे १६ लाख इतकी होती. मक्का शहर जेद्दाह येथील किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच मदीना ह्या इस्लामधील दुसऱ्या क्रमांकाच्या पवित्र शहरासोबत ४५३ किमी लांबीच्या द्रुतगती रेल्वेद्वारे जोडले गेले आहे.

हे सुद्धा पहा

  • सौदी अरेबियामधील शहरांची यादी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

विकिव्हॉयेज वरील मक्का पर्यटन गाईड (इंग्रजी)