Jump to content

मकरंद अनासपुरे

मकरंद अनासपुरे
जन्ममकरंद मधुकर अनासपुरे
२२ जून, इ.स. १९७३
बीडकीन, छत्रपती संभाजीनगर ,महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख चित्रपट चित्रपट
पुरस्कार स्टार स्क्रीन अवार्ड

मकरंद मधुकर अनासपुरे (२२ जून, इ.स. १९७३; छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र - हयात) हे मराठी चित्रपट, नाटक व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते आहेत. मराठवाडी बोलीच्या ढंगातील संवादफेकीसाठी व विनोदी अभिनयासाठी ते प्रसिद्ध आहेत. स. भु. महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर नाट्यशास्त्र विभागात होतो.

काही चित्रपटांचीही त्यांनी निर्मिती केली आहे. ‘डॅबिस’ या चित्रपटाचे पटकथालेखन, दिग्दर्शन व निर्मिती त्यांची आहे.

परिचय

मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेसॄष्टीतील आघाडीचा विनोदी अभिनेता आहेत. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली आहे.. त्यांनी सुरुवातीला मिळतील त्या भूमिका केल्या. मात्र त्याही भूमिका प्रेक्षकांच्या खास लक्षात राहिल्या. शेवटी त्यांना अभिनेता म्हणून चित्रपट मिळत गेले आणि ते प्रसिद्ध होत गेले. चित्रपट जरी चालला नाही तरी त्यांचा अभिनय मात्र नक्कीच लोकांना आवडायला लागला. आज मराठी चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त मागणी असलेले अभिनेता मकरंद म्हणून अनासपुरेंकडे पाहिले जाते. त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकांसह अन्य बहुरंगी भूमिका केल्या आहेत.

कारकीर्द

दूरचित्रवाणी कार्यक्रम

  1. हप्ता बंद
  2. नाममात्र

चित्रपट

क्र. वर्ष (इ.स.) चित्रपट
१९९७सरकारनामा
१९९९वास्तव
२००४सातच्या आत घरात
२००४सावरखेड : एक गाव
२००५खबरदार
२००५काय द्याच बोला
२००६शुभमंगल सावधान
२००६नाना मामा
२००७गाढवाचं लग्न (चित्रपट)
१०२००७जाऊ तिथे खाऊ
११२००७तुला शिकवीन चांगला धडा
१२२००७अरे देवा
१३२००७जबरदस्त
१४२००७साडे माडे तीन
१५२००८दोघात तिसरा आता सगळ विसरा
१६२००८ऑक्सिजन
१७२००८फुल ३ धमाल
१८२००८उलाढाल
१९२००८दे धक्का
२०२००९मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
२१२००९गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा
२२२००९गोष्ट छोटी डोंगराएवढी
२३२००९नऊ महिने नऊ दिवस
२४२००९निशाणी डावा अंगठा
२५२०१०मना सज्जना
२६२०१०बत्ती गुल पावरफुल
२७२०१०खुर्ची सम्राट
२८२०१०अगडबम
२९२०१०तुक्या तुकाविला नाग्या नाचीविला
३०२०१०हापूस
३१२०१०पारध
३२२०११डावपेच
३३२०११गुलदस्ता
३४२०११दोन घडीचा डाव
३५२०११डॅंबिस
३६ २०११ तिचा  बाप  त्याचा  बाप
३७ २०१२ तीन  बायका  फजिती  एका
३८ २०१२ मला  एक  चानस  हवा 
३९ २०१६ कापूस  कोंड्याची  गोष्ट  कापूस  कोंड्याची  गोष्ट 
४० २०१६ रांगा  पतंगा
४१शकून अपशकून
४२तो एक राजहंस
४३तिसरा डोळा
४४त्याच्या मागावर
४५शेजार
४६आमच्या सारखे आम्हीच
४७टूर टूर
४८गंगूबाई नॉनमॅट्रीक
४९जिभेला काही हाड
५०तू तू मैं मैं
५१गोष्ट छोटी डोंगराएवढी (लेखक)
५२गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा (लेखक)
५३डॅंबिस (लेखक/दिग्दर्शक)
५४ २०२३ यशवंत (परदेशी गुरुजींची भूमिका, पियुष विजय भोंडे यांचा मराठी चित्रपट)

सामाजिक कार्य

मकरंद अनासपुरे यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते नाना पाटेकर याच्या बरोबर नाम फाउंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थे अंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करतात.[]

मकरंद अनासपुरे यांना मिळालेले पुरस्कार

  • बीडच्या रोटरी क्लबचा चंपावतीरत्‍न पुरस्कार
  • बाणेर (पुणे)च्या योगिराज सहकारी पतसंस्थेतर्फे ’योगिराज भूषण पुरस्कार’.(३०-९-२०१५)
  • गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा कलागौरव पुरस्कार (७-१०-२०१५)
  • सह्याद्री प्रतिष्ठानचा श्रीराम गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्कार

संदर्भ

  1. ^ "बळीराजासाठी नाना-मकरंदची 'नाम' फाउंडेशन-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-08-28 रोजी पाहिले.[permanent dead link]

बाह्य दुवे