Jump to content

मंदाकिनी गोगटे

मंदाकिनी गोगटे
जन्म नाव मंदाकिनी कमलाकर गोगटे
जन्म १६ मे १९३६
मुंबई, महाराष्ट्र
मृत्यू १५ जानेवारी २०१०
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वमराठी, भारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकथा, कादंबरी
पती कमलाकर ना. गोगटे
अपत्ये तीन मुली; त्यांतली एक रेखा (सौ. अनघा हुन्नूरकर)

मंदाकिनी कमलाकर गोगटे (जन्म : मुंबई, १६ मे १९३६; - मुंबई, १५ जानेवारी २०१०)[] या मराठी लेखिका होत्या. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगाव शाखेच्या त्या अध्यक्षा होत्या.

जीवन

मंदाकिनी गोगट्यांचा जन्म मे १६, इ.स. १९३६ रोजी ब्रिटिश भारतातील तत्कालीन मुंबई इलाख्यात मुंबई येथे झाला. त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले[]. त्यापूर्वी त्यांनी चित्रकला शिक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यांच्या लघुकथा प्रथम सत्यकथा मासिकातून प्रसिद्ध झाल्या. पुढील काळात त्यांनी प्रामुख्याने विनोदी कथा व बालसाहित्य लिहिले.

जानेवारी १५, इ.स. २०१० रोजी मुंबईत कर्करोगाने त्यांचे निधन झाले.


मंदाकिनी गोगटे यांचे प्रकाशित कथासंग्रह

  • गंध मातीचा
  • ढळता दिवस
  • प्रेमाच्या होड्या
  • बायकांचं गणित
  • मुंबईच्या रंगीबेरंगी मुली
  • सवत माझी लाडकी (कथेवर आधारित त्याच नावाचा चित्रपट आहे.)
  • स्वप्नातली परी

कादंबऱ्या

  • दीपाली
  • गाणारं घर (अप्रकाशित)
  • गार्गी
  • भैरवी
  • मोठी वेगळी पाऊलवाट
  • रसिक बलमा
  • ह्या कातर उत्तररात्री

प्रवासवर्णनपर पुस्तके

  • आमचीपण सिंदबादची सफर
  • त्या फुलांच्या सुंदर प्रदेशात

बालसाहित्य व इतर

  • चिमाजीअप्पाची मिशी (निबंधमाला)
  • छानदार कथा भाग १ व २
  • जांबो जांबो ग्वाना
  • प्रेमा पुरव : क्रांतिकारी अन्नपूर्णा (चरित्रकथा)
  • बागेश्री दिवाळी अंक (संपादन व प्रकाशन)
  • बोले तैशी चाले (एकांकिका)
  • महंमद घोरीची सांगली (विज्ञानकथा)
  • सर्पांची अजब दुनिया

पुरस्कार

  • आचार्य अत्रे पुरस्कार

संदर्भ

  1. ^ a b "ज्येष्ठ लेखिका मंदाकिनी गोगटे यांचे निधन". २७ ऑक्टोबर, इ.स. २०१० रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे