Jump to content

मंत्रालय (मुंबई)



मंत्रालयाची दक्षिण मुंबईमधील मुख्य इमारत
मंत्रालयाची दक्षिण मुंबईमधील मुख्य इमारत

मंत्रालय महाराष्ट्र सरकारच्या दक्षिण मुंबईमधील कार्यालय इमारतसमूह आहे. यातील इमारती इ.स. १९५५मध्ये बांधण्यात आल्या होत्या. यातल्या मुख्या इमारतीला पूर्वी सचिवालय असे नाव होते. सात मजल्यांच्या या इमारतीत महाराष्ट्र शासनाचे बहुतांश विभाग आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालय सहाव्या मजल्यावर आहे, तर प्रधान सचिव पाचव्या मजल्यावर असतात. मुख्य इमारतीस जोडून आणखी एक इमारत नंतर बांधण्यात आली आणि रस्त्यापलीकडे अजून एक तेरा मजली इमारत बांधण्यात आली आहे. सचिवालयाला मंत्रालय म्हणण्याची पद्धत फक्त महाराष्ट्रात आहे. मुंबईतील मंत्रालयात सामान्य जनतेला दुपारी दोन वाजल्यानंतर ओळखपत्र पाहून प्रवेश देण्यात येतो.

हे सुद्धा पहा

  • विधान भवन, नागपूर