Jump to content

मंजुषा कुलकर्णी

डॉ. मंजुषा कुलकर्णी या संस्कृत भाषेच्या अभ्यासक आहेत. त्यांनी डॉ.प्रकाश आमटे यांच्या प्रकाशवाटा या आत्मचरित्राच्या संस्कृतमध्ये केलेल्या 'प्रकाशमार्गा:' या अनुवादाला २०२१ साली साहित्य अकादमीचा संस्कृत साहित्यासाठीचा पुरस्कार मिळाला.[][]

सुरुवातीचे आयुष्य

मंजुषा कुलकर्णी यांचे मूळ गाव परळी वैजनाथ असून त्यांचे पणजोबा दत्तात्रय कुलकर्णी हे साहित्यिक होते.

कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण वैजनाथ विद्यालयात झाले तर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण लिट्ल फ्लॉवर स्कूलमध्ये झाले.[]

शिक्षण

१९९७ साली कुलकर्णी यांनी पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून कला शाखेतली पदवी प्रथम क्रमांकासहित घेतली.[] तसेच त्याचवेळी त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत विषयात प्रथम क्रमांकासहित पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी संस्कृत विषयात पदव्युत्तर पदवी पुणे विद्यापीठातून प्रथम क्रमांकासहित मिळवली. त्यानंतर त्यांनी एम.एड. केले. पुढे त्यांनी संस्कृत विषयात पी.एचडी. मिळवली. त्या सेट (शिक्षणशास्त्र) आणि नेट (संस्कृत) या परीक्षा उत्कृष्ट गुणांनी उतीर्ण झाल्या.

कारकीर्द

औरंगाबाद, नांदेड आणि अमरावती विद्यापीठांमध्ये डॉ.कुलकर्णी संशोधन मार्गदर्शिका म्हणून कार्यरत आहेत.

कुलकर्णी महाराष्ट्र राज्याच्या भाषा संचालनालयाच्या पहिला महिला संचालक आहेत. भाषाविषयक शासकीय धोरण तयार करण्यात त्यांनी योगदान दिले आहे.

प्रकाशित पुस्तके

  • अणुविज्ञानातील झंझावात हे डॉ.अनिल काकोडकरांवरील पुस्तक[][]
  • श्यामची आई या मराठी पुस्तकाचा संस्कृतमध्ये अनुवाद[]
  • विवेकज्योती या मराठी पुस्तकाचा संस्कृतमध्ये अनुवाद[]

पुरस्कार

  • 'प्रकाशमार्गा:' या अनुवादाला साहित्य अकादमीचा पुरस्कार (२०२१)[]
  • विद्यारत्न पुरस्कार (२०१०)[]
  • महिला गौरव पुरस्कार (२०११)[]
  • द्वारका प्रतिष्ठानचा उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार (२०१७)[]
  • ई टीव्हीचा 'सुपर वुमन' पुरस्कार[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b author/lokmat-news-network (2021-09-22). "मंजुषा कुलकर्णीना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर". Lokmat. 2021-10-05 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e f g h i "संस्कृत भाषाव्रताचा सन्मान". Loksatta. 2021-10-05 रोजी पाहिले.
  3. ^ "'अणुविज्ञानातील झंझावात डॉ.अनिल काकोडकर' पुस्तकाचे प्रकाशन | राजभवन महाराष्ट्र | भारत". 2021-10-05 रोजी पाहिले.
  4. ^ "राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते 'अणुविज्ञानातील झंझावात; डॉ.अनिल काकोडकर' पुस्तकाचे प्रकाशन". www.pressalert.in (इंग्रजी भाषेत). 2021-10-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-05 रोजी पाहिले.