मंजाल कुल्ली
मंजाल कुल्ली हा भारत देशाच्या केरळ राज्यातील होळी उत्सव आहे.[१]
स्वरूप
केरळ मधील विशेषतः मल्याळी भाषिक गटातील सदस्यांचा हा विशेष सण मानला जातो. मंदिरांच्या परिसरात , पारंपरिक वाद्यांच्या साथीने केले जाणारे लोकनृत्य हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. लोक एकमेकांवर पाणी उडवून, एकमेकांना हळद लावतात आणि होळीचा आनंद घेतात. हळदीचे पाणी उत्तर दिशेला शिंपडतात आणि दुर्गादेवीने राक्षसांवर मिळविलेल्या विजयाचा आनंद साजरा करतात.[२] गोश्रीपुरम थिरुमा या कोंकणी आणि कुदुंबी समुदायाच्या मंदिरात उत्सव साजरा करण्यासाठी या समुदायाचे बंधु भगिनी एकत्र येतात.[३]
संदर्भ
- ^ Experts, EduGorilla Prep (2022-08-03). SSC CPO Paper II Exam 2022 Prep Book | Recruitment of Sub-Inspector (SI) | 2000+ Solved Questions [10 Full-length Mock Tests] (इंग्रजी भाषेत). EduGorilla Community Pvt. Ltd.
- ^ Srivastava, Geeta. Holi Hai! - The Spring Festival of Colour (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 979-8-88986-901-6.
- ^ Dey, Panchali DeyPanchali. "Unique Holi traditions in North, East, West and South of India". ISSN 0971-8257.