Jump to content

मंगळूर

मंगळूर, मॅंगलोर, किंवा मंगलोर हे भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. (मंगलौर नावाचे एक गाव उत्तराखंडमध्ये हरिद्वार जिल्ह्यात आहे).

हे शहर दक्षिण कन्नड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. मंगळूराचे नाव मंगळूरु (किंवा मॅंगालूरु) करण्याचे घाटत आहे. मंगळूरात तूळू व कोंकणी भाषा बोलल्या जातात.

या गावात तयार होणारी मंगलोरी कौले भारतभर प्रसिद्ध आहेत.