मंगळदोष
वधुवरांचे विवाह जमवितांना,उभयतांचे जन्मकुंडलीत १,४,७,८ व १२ यापैकी कोणत्याही एका स्थानी मंगळ हा ग्रह असेल तर ती मंगळदोषाची कुंडली असे समजतात.ती ज्या व्यक्तीची कुंडली असेल त्या व्यक्तीस मंगळदोष आहे असे समजतात.प्रथम स्थानी मेषेचा मंगळ,चतुर्थात वृश्चिकेचा मंगळ,सप्तमात मकरेचा मंगळ अष्ट्मात कर्केचा मंगळ तर द्वादशात धनेचा मंगळ असल्यास ती कुंडली दोषार्ह नाही असे समजतात.
अपवाद
मंगळ असलेल्या सर्व कुंडल्या दोषावह असतीलच असे नाही.यास अनेक अपवाद आहेत.
मंगळनाशक योग
- दोषार्ह मंगळ कुंडलीत,१,३,७,८,१२ या पैकी कोणत्याही एका स्थळी जर शनी असेल तर त्या कुंडलीतील मंगळाचा दोष नाहीसा होतो असे समजण्यात येते.
- बलवान शुक्र अथावा गुरू हा ग्रह सप्तम स्थानात अथवा लग्नात असेल तर मंगळनाशक योग होतो.मंगळाचा दोष रहात नाही.
- चंद्र केंद्र स्थानांत असेल तर मंगळाचा दोष रहात नाही.
- चंद्र मंगळ एकत्र असतांना लक्ष्मीकारक योगामुळे मंगळाचा दोष रहात नाही.
- मंगळासमवेत राहू असतांना मंगळाचा दोष रहात नाही.