Jump to content

मंगरूळ

मंगरूळ हे खेडेगाव भारतीय संघराज्याच्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात भोल्डी नदीच्या काठावर वसलेले आहे. मंगरूळ हे गाव मंगळेश्वराचे हेमाडपंथी मंदिर असलेले गाव म्हणून ओळखले जाते. मंगरूळ गावाच्या मध्यभागी मांगवीर बाबाचे मोठे मंदिर आहे. ते एक जागृत दैवत मानले जाते. त्याच्या दर्शनाकरिता दर अमावस्येला भक्तांची गर्दी असते. तसेच गावापासून दक्षिणेला अर्धा किमी अंतरावर असलेल्या छोट्या टेकडीवर खंडोबाचे मंदिर आहे.

मंगरूळ गावात जिल्हा परिषदेची इयत्ता १ ते ७ पर्यंतची शाळा आहे. इयत्ता ५ ते १० पर्यंतच्या शिक्षणासाठी गावात सोनाई शिक्षण संस्था चिंचोली लिंबाजी संचलित मंदोदरी माध्यमिक विद्यालय आहे.

मंगरूळ गावातील आजपर्यंतचे सरपंच,उपसरपंच व कालावधी

अ.क्र. सरपंचाचे संपूर्ण नाव उपसरपंचाचे संपूर्ण नाव कालावधी
१. शेख गुलामनबी अ. रहेमान श्री.माणिकराव गोपाळा खेळवणे ३०.०५.१९५९ ते ३०.०५.१९६४
२. श्री.कौतिकराव बाळा वर्पे श्री.बाबुराव तोताराम पालोदे ३०.०५.१९६४ ते १९.१०.१९६७
३. श्री.लक्ष्मण बाळा कोल्हे श्री.कौतिकराव बाळा वर्पे १९.१०.१९६७ ते २२.११.१९७१
४. श्री.भिका तुकाराम खेळवणे श्री.गणपत गोविंदा खेळवणे २२.११.१९७१ ते १७.०८.१९७८
५. श्री.दिगंबर कडूबा ढोरमारे श्री.संपत माणिकराव वर्पे १७.०८.१९७८ ते ०८.०५.१९८४
६. अमजद हुसेन म. इसा श्री.माणिकराव विठोबा भागवत ०८.०५.१९८४ ते ०६.०२.१९८९
७. श्री.मधुकर गीरधर बरडे श्री.माणिकराव तोताराम पालोदे ०६.०२.१९८९ ते ०१.११.१९९३
८. प्रशासक प्रशासक ०१.११.१९९३ ते ०१.०१.१९९५
९. प्रशासक प्रशासक ०१.०१.१९९५ ते ०९.०९.१९९५
१०. श्री.सदाशिव रामचंद्र जोशी सौ.सैनाबाई पांडुरंग वर्पे ०९.०९.१९९५ ते ०९.०९.२०००
११. सौ.मनीषाबाई श्रावण हासे श्री.मधुकर गीरधर बरडे ०९.०९.२००० ते १४.०९.२००५
१२. श्री.सदाशिव रामचंद्र जोशी श्री.तेजराव गणपत घोडसे १४.०९.२००५ ते १४.०९.२०१०
१३. श्री.सतिष प्रकाश बोर्डे श्री.निवृत्ती केशव वर्पे १४.०९.२०१० ते १४.०९.२०१५
१४. श्री.संजय गणपत वरपे श्री.अंबादास हरी बरडे १४.०९.२०१५ ते चालू
श्री.बालाजी दशरथ खेळवणे
१५. श्रीमती.स्वाती राजू वडनेरे श्री.शिवाजी नारायण बरडे
१६. श्रीमती.जयश्री निवृत्ती वर्पे श्री.शिवाजी नारायण बरडे