मंगरुळपीर तालुका
?मंगरुळपीर महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
मोठे शहर | वाशिम, अकोला |
मोठे मेट्रो | नागपूर |
जवळचे शहर | कारंजा(लाड) |
प्रांत | विदर्भ |
विभाग | अमरावती |
भाषा | मराठी |
तहसील | मंगरुळपीर |
पंचायत समिती | मंगरुळपीर |
कोड • पिन कोड • दूरध्वनी | • 444403 • +०७२५३ |
मंगरुळपीर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्याचा एक तालुका आहे. मंगरुळपीर शहरास नगरपालिका आहे. ह्या शहरातील बहुसंख्य लोकसंख्या धर्माने मुस्लिम व हिंदू आहे. नाथपरंपरेतील विभूती श्री. बिरबलनाथ महाराज यांच्यामुळे हे शहर "मंगरुळनाथ" नावानेही ओळखले जाते. दरवर्षी येथे श्री. बिरबलनाथ महाराजांच्या नावे यात्रा भरते. ही यात्रा पाहायला आजूबाजूच्या गावांतून अनेक लोक येतात. पीर दादा हयात कलंदर ह्यांचा दर्गा हे या शहराचे वैशिष्ट्य आहे. शहराच्या नावात 'पीर' असण्याचे कारण हेच आहे. येथे हिंदू आणि मुस्लिम समाजाचे लोक मिळून मिसळून राहतात.
ठिकाण
जिल्ह्याचे ठिकाण वाशिम येथून मंगरूळपीरचे अंतर ४० किमी आहे. तर महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबईपासून ६७१ किमी इतके आहे. वाशिम आणि अकोला ह्या जिल्ह्यांच्या उत्तर-दक्षिण सीमेवर मंगरुळपीर आहे. जवळचे रेल्वेस्थानक वाशिम येथे आहे.
तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळे
- श्री बिरबलनाथ महाराज मंदिर, मंगरूळपीर शहर
- दादा हयात कलंदर दर्गा,मंगरूळपीर शहर
- श्री महादेव मंदिर आणि पाण्याचे कुंड, येडशी, मंगरुळपीर
- श्री संत भायजी महाराज संस्थान, तऱ्हाळा, मंगरूळपीर
- मकान शरीफ दर्गा,तऱ्हाळा, मंगरूळपीर
- श्री संत बुढेबाबा मंदिर, चांभई, मंगरूळपीर
- पिंपळखुटा संगम (अडाण व मडाण नद्यांचा संगम) व श्री भायजी महाराज मंदिर, पिंपळखुटा संगम, मंगरूळपीर
- श्री कान्होबा मंदिर,सावरगाव, मंगरूळपीर (नवनाथांपैकी एक असलेले श्री कानिफनाथ ह्यांचे मंदिर)
- श्री वामन महाराज आश्रम, कोलार, मंगरूळपीर
- मा जगदंबा भवानी मंदिर, पारवा, मंगरूळपीर
- भवानी माता मंदिर, मानोली, मंगरूळपीर
तालुक्यातील गावे
बाराखडीनुसार अनुक्रमे :
- अरक
- आजगाव (मंगरुळपीर)
- आमगव्हाण (मंगरुळपीर)
- आसेगाव
- अंबापूर
- इचा
- इचोरी
- इस्माईलपूर
- उमरडोह
- उमरी बुद्रुक
- एकांबा (मंगरुळपीर)
- कवठळ
- कळंबा
- कासोळा (मंगरुळपीर)
- कोठारी (मंगरुळपीर)
- कोळांबी
- कंझारा
- कुंभी (मंगरुळपीर)
- खडी (मंगरुळपीर)
- खापरदरी
- खारबी (मंगरुळपीर)
- खेरडा खुर्द (मंगरुळपीर)
- खेरडा बुद्रुक (मंगरुळपीर)
- गणेशपूर (मंगरुळपीर)
- गोगरी
- गोलवाडी
- गिंभा
- घोटा
- चकवा
- चिखलगड
- चिखली (मंगरुळपीर)
- चुकांबा
- चेहेळ
- चोराड
- चांभई
- चांधाई
- चिंचाखेड
- चिंचाळा (मंगरुळपीर)
- जांब (मंगरुळपीर)
- जुनापाणी
- जानुणा बुद्रुक
- जानुणा खुर्द
- जोगलदरी
- झाडगाव (मंगरुळपीर)
- तपोवन (मंगरुळपीर)
- तऱ्हाळा (मंगरूळपीर)
- तुळजापूर (मंगरुळपीर)
- तांदळी
- दस्तापूर (मंगरुळपीर)
- दाभा (मंगरुळपीर)
- दाभाडी (मंगरुळपीर)
- दावखा
- दिलावळपूर
- धनोरा बुद्रुक
- धनोरा खुर्द
- धर्मापूर
- धोत्रा (मंगरुळपीर)
- नागी
- नावखी
- नांदगाव (मंगरुळपीर)
- नांदखेडा
- निंबी
- पारडी (मंगरुळपीर)
- पारवा (मंगरुळपीर)
- पुर
- पेडगाव
- पोघाट
- पोटी
- पेठखुदावतपूर
- पांगरी (मंगरुळपीर)
- पिंपरी बुद्रुक (मंगरुळपीर)
- पिंपरी खुर्द (मंगरुळपीर)
- पिंपळगाव (मंगरुळपीर)
- पिंपळखुटा (मंगरुळपीर)
- पिंपळशेंडा (मंगरुळपीर)
- फाळेगाव (मंगरुळपीर)
- बहादरपूर (मंगरुळपीर)
- बालदेव
- बितोडा
- बेलखेड (मंगरुळपीर)
- बोरव्हा बुद्रुक
- बोरव्हा खुर्द
- भडकुंभा
- भामरुण
- भुर
- माजलापूर
- माळशेलु
- मानोली (मंगरुळपीर)
- मासोळा बुद्रुक
- मासोळा खुर्द
- मुर्तिजापूर (मंगरुळपीर)
- मोझरी (मंगरूळपीर)
- मोतसावंगा
- मोहारी
- मोहोगव्हाण
- मंगळसा
- येडशी (मंगरुळपीर)
- येडाळपूर
- राहिट
- रामगढ
- रामगाव (मंगरुळपीर)
- रायपूर (मंगरुळपीर)
- रूई (मंगरुळपीर)
- रेणकापूर (मंगरुळपीर)
- लखमापूर
- लाठी (मंगरुळपीर)
- लावणा
- लाही
- वरूड बुद्रुक
- वरूड खुर्द
- वसंतवाडी (मंगरुळपीर)
- वाधा
- वाणोजा (मंगरुळपीर)
- शाहपूर बुद्रुक
- शाहपूर खुर्द
- शिवणी (मंगरुळपीर)
- शिवाणी
- शेगी
- शेंदुर्जणा
- शेलुबाजार
- शेळगाव
- शेळु खुर्द (मंगरुळपीर)
- सत्तरसावंगी
- साणलापूर
- सायखेडा
- सारशी (मंगरुळपीर)
- सावरगाव (मंगरुळपीर)
- सावळापूर (मंगरुळपीर)
- साळांबी
- सोनखास (मंगरुळपीर)
- सांगाव (मंगरुळपीर)
- स्वासिण
- हिरंगी
- हिसाई
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://en.wikipedia.org/wiki/Mangrulpir
वाशिम जिल्ह्यातील तालुके |
---|
कारंजा लाड तालुका | मंगरुळपीर तालुका | मालेगाव तालुका | रिसोड तालुका | वाशिम तालुका | मानोरा तालुका |