भोवानी जंक्शन
भोवानी जंक्शन तथा भवानी जंक्शन हा १९५६मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. मेट्रो-गोल्डविन-मायरद्वारे निर्मित हा चित्रपट याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. यात १९४७ च्या सुमारास ब्रिटिश लश्करात असलेल्या ॲंग्लो-इंडियन अधिकारीची गोष्ट आहे. या चित्रपटात ॲव्हा गार्डनर, स्ट्युअर्ट ग्रेंजर, बिल ट्रॅव्हर्स आणि अब्राहम सोफेरच्या मुख्य भूमिका होत्या.