भोपळ्याची पुरी
भोपळ्याची पुरी भोपळ्यापासून तार करण्यात येणारा खाद्यपदार्थ आहे.
साहित्य
लाल भोपळा, गुळ, तेल, गव्हाचे पीठ, कढई, खिसणी, प्रेसर कुकर, पाणी.
कृती
सर्वप्रथम भोपळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा, त्यानंतर त्याचे उभे काप करून घ्यावे. त्यानंतर भोपळ्या वरील साल काढून घ्यावी, त्या नंतर प्रेशर कुकर मध्ये अर्धा कप पाणी टाकावे व त्यात भोपळ्याचे काप टाकून कुकरच्या दोन शिट्या घ्यावा.
कुकर मधून भोपळ्याचे काप काढून ते थंड होऊ द्यावे. त्यानंतर त्यामध्ये गुळ व गव्हाचे पीठ मिक्स करावे, त्यात थोडे तेल टाकून मळून घ्यावे. पीठ मऊ झाल्यावर ते लाटून घ्यावी त्यानंतर कढई मध्ये तेल गरम करून लाटणी त्या मध्ये सोडावी व लाल होई पर्यंत तळावी, त्यानंतर ती एका पेपर वर काढून घ्यावी.