भोपळा
तांबडा भोपळा ( वनस्पतीशास्त्रीय नाव:Cucurbita maxima; कुळ:Cucurbitaceae ;इंग्लिश:Pumpkin(पमकिन) ; हिंदी: कद्दू ;) ही वेलवर्गातील वनस्पती आहे. याच्या मोठया आकाराच्या फळाची भाजी वा भरीत करतात किंवा भोपळघारगे नावाचा गोड पदार्थही करतात.तसेच भोपळ्याची खीर ,पराठे, इत्यादी पदार्थ करतात.तसेच भोपळा आरोग्यासाठी खूप महत्त्वांचा आहे. भोपळा एक स्थलीय, द्विबीपत्री झाड आहे. ज्याचे खोड लांब, कमजोर आणि हिरव्या रंगाचे असून खोडावर लहान कूसासारखे असते हे आपल्या आकषा द्वारे वाढतो व चढ़ताे. याचे पान हिरवे, आणि वृत्ताकार असतात. याचे फुले पिवळे रंगाचे नियमित आणि अपूर्ण घंटाकार असतात. नर आणि मादा पुष्प वेग वेगळे असतात व नर आणि मादा दोन्ही फुलात पाच जोडी बाह्यदल तसेच पाच जोडी पीवळे रंगाचे दलपत्र असतात. नर पुष्प मध्ये तीन पुंकेसर असतात ज्यातील दोन एक जोडी बनवून आणि तीसरा स्वतंत्र असतो. मादा पुष्प मध्ये तीन संयुक्त अंडप उपस्थित असतात ज्याला युक्तांडप म्हणतात. याचे फळ लंब अथवा गोलाकार असते. फळात अात खूप बी असतात. फळाचे वजन ४ ते ८ किलोग्राम पर्यंत असू शकते. सर्वात मोठी प्रजाति मैक्सिमाचे वजन ३४ किलोग्राम पेक्षा जास्त असते. हे संपूर्ण विश्व मध्ये लावले जाते. संयुक्त राज्य अमेरिका, मेक्सिको, भारत आणि चीन याचे सर्वात मोठे उत्पादक देश आहे. या झाडाचे वय एक वर्ष असते. हा पुष्टीदायक आहे. मोठ्या आजारानंतर शरीर क्षीण झाले तर, जेवणात भोपळा घेतला पाहिजे, काही दिवसांनी दौर्बल्य नाहीसे होते.
पौष्टिक तत्त्व
आहार विशेषज्ञांचे मत आहे की भोपळा हृदयरोगींसाठी अत्यंत लाभदायक आहे. तो कोलेस्ट्राल कमी करताे, हा उष्णता कमी करणारा आणि मूत्रवर्धक आहे. तसेच पोटाच्या गड़बड़ी कमी करणारा आहे. रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित करताे आणि अग्न्याशयला सक्रिय करताे या मुळे चिकित्सक मधुमेह रूग्णांसाठी भोपळा खाण्याचे सल्ला देतात. याचे रस पण स्वास्थ्यवर्धक मानला जातो. भोपळ्यात मुख्यतः बीटा केरोटीन असते, ज्यामुळे विटामिन ए मिळते. पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या भोपळ्यात केरोटीनचे प्रमाण जास्त असते. भोपळ्याचे बी पण आयरन, जिंक, पोटेशियम आणि मैग्नीशियमचे चांगले स्रोत आहे. जग भरात याचा उपयोग केला जातो त्यामुळे २९ सप्टेंबरला 'पंपकिन डे' म्हणून साजरा केला जातो.
भोपळ्याची_शेती
सतार व तंबोऱ्याची निर्मिती करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे भोपळे लागतात.‘ही दोन्ही वाद्ये तयार करण्यासाठी वापरला जाणारा भोपळा दर्जेदार असतो. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात भीमा, चंद्रभागेच्या तीरावरच्या वाळवंटी जमिनीत पिकवले जातात. हे भोपळे चवीला अत्यंत कडू असतात. नदीच्या काठावर काही मोजक्या गावांमध्ये या भोपळ्याचे पीक घेतले जाते. तेथील विशिष्ट हवामान, माती यामुळे हे भोपळे वजनाने हलके आणि बाहेरून टणक तयार होतात. त्यामुळे त्यातून मधुर सूर निर्माण होतो.
भोपळ्याच्या एका बीपासून सतारीपर्यंतचा प्रवास खूपच दिलचस्प असाच म्हणावा लागेल. सतारीसाठी जो भोपळा वापरला जातो तो मूळचा आफ्रिकेतला. आफ्रिकेतल्या आदिवासी जमाती याचा वापर मध, दारू, पाणी साठवून ठेवण्यासाठी करत. कालांतरानं इतर गोष्टींसारखाच तो भारतात पोहोचला. पंढरपूर जिल्हामध्ये याचं उत्पन्न घेतलं जातं. हा भोपळा वाढण्यासाठी आणि चांगला वाळण्यासाठी कोरडी जमीन आणि उष्ण वातावरण लागतं. चंद्रभागेच्या काठावरच्या बेगमपूर, सिद्धापूर या खेड्यांमध्ये याची पैदास होते. शेतकरी साधारण श्रावणात किंवा दसरा झाल्यानंतर आपल्या शेतात भोपळ्याच्या बियांची लागवड करतात. हे भोपळे खासकरून वाद्य तयार करण्यासाठीच पिकविले जातात. याची पूर्ण वाढ होण्यासाठी आठ-नऊ महिन्यांचा काळ जातो. या कालावधीत मिरजेतले सतार बनवणारे व्यावसायिक पंढरपूर, सोलापूरला जाऊन भोपळ्याची खरेदी करून, ते तिथेच वाळण्यासाठी ठेवतात. हा भोपळा वेलीवरच वाळलेला चांगला. शेतकरी याची विशेष काळजी घेतात जेणेकरून यांचा आकार बिघडता कामा नये. मार्च महिन्यात वाढ पूर्ण होताच हे भोपळे देठापासून कापून शेतातच वाळविण्यासाठी ठेवले जातात. पंढरपूरच्या उष्णतेत होरपळून निघालेले अद्वितीय असे हे भोपळे न आक्रसता आपला आकार तसूभरही बदलत नाहीत. ही पंढरपूर भागातल्या भोपळ्यांची खासियतच म्हणावी लागेल. हे भोपळे पूर्णपणे सुकल्यानंतर ते विक्रीसाठी ठेवले जातात आणि त्यांना चांगला भावही मिळतो. वेलीवर चार-पाच भोपळे लागले की शेतकरी ती वेल खुडून, वेलीची वाढ थांबवतात. त्यामुळे वेलीला तोवर लागलेले भोपळे चांगले पोसले जातात आणि त्यांचा आकार मोठा होतो. हा भोपळा चवीला कडू असतो. त्यामुळे माणसं किंवा जनावरं तो खात नाहीत. भोपळ्याचा देठ चांगला वाळला की तो तोडला जातो. साधारण मेपर्यंत भोपळा कडक उन्हामध्ये चांगला वाळला की व्यापारी टेंपोत भरून तो मिरजेला घेऊन येतात. मिरजेत दाखल झाल्यानंतर व्यापारी त्यांना पोटमाळ्यावर टांगून ठेवतात. पुढची किमान ५० वर्षं या भोपळ्यांना काहीही होत नाही. पोटमाळ्यावर ठेवण्यापूर्वी खोलीच्या छताखाली ते कोणती जागा पटकावणार हे त्या भोपळ्याचा घेरच ठरवितो. त्यावर त्याची शाईने तशी नोंद केली जाते. जेव्हा सतार किंवा तंबोरा तयार करण्याची ऑर्डर मिळते त्यावेळी प्रत्येकाच्या सोयीनुसारच तो तयार केला जातो, मग तो वापरणारा पुरूष किंवा स्त्री कोणीही असो, त्याला जो योग्य, सोयीचा वाटेल तोच भोपळा त्याच्यासाती निवडला जातो .