भोकर विधानसभा मतदारसंघ
हा लेख नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघ याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, भोकर (निःसंदिग्धीकरण).
भोकर विधानसभा मतदारसंघ - ८५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, भोकर मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड आणि भोकर या तालुक्यांचा समावेश होतो. भोकर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अशोकराव शंकरराव चव्हाण हे भोकर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | अशोकराव चव्हाण | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२०१४ | अमिता अशोकराव चव्हाण | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२००९ | अशोक शंकरराव चव्हाण | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२००४ | बापुसाहेब गोरठेकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
१९९९ | बाबासाहेब देशमुख गोरठेकर | अपक्ष | |
१९९५ | माधव भुजंगराव किन्हाळकर | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
१९९० | माधव भुजंगराव किन्हाळकर | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
भोकर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
अशोक शंकरराव चव्हाण | काँग्रेस | १२०८४९ |
माधव भुजंगराव किन्हाळकर | अपक्ष | १३३४६ |
भीमराव क्षीरसागर | शिवसेना | ६४०५ |
बापुराव गजभारे | बहुजन समाज पक्ष | ६२७९ |
बालाजी क्षीरसागर | अपक्ष | १४९० |
किशनराव हलगुंडे | स्वतंत्र भारत पक्ष | १४३३ |
जफर पठाण | अपक्ष | ६०१ |
विजयकुमार पाटील | अपक्ष | ५३९ |
विष्णु जाधव | अपक्ष | ४२० |
नारायण डोणगावकर | अपक्ष | ३६२ |
वरीलपैकी कोणीही नाही | NOTA | ०७ |
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर भोकर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.