भोकरदन
?भोकरदन महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
मोठे शहर | औरंगाबाद |
विभाग | औरंगाबाद |
लोकसंख्या • शहर | ७०,४१६ (2018) • 70000 |
भाषा | मराठी आणी हिंदी |
तहसील | भोकरदन |
पंचायत समिती | भोकरदन |
कोड • पिन कोड | • 431114 |
भोकरदन हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. आणि हे भारतातील सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक शहरांपैकी एक आहेत, प्राचीन श्रीकृष्ण(तुकाई) लेणी आणि बौद्ध लेणी आणि लाल गडी ,गौस्पक दर्गा, रामेश्वर मंदिर आणि भोकरदन किल्ला जो आज तहसील म्हणून ओळखला जातो.
इतिहास
उत्तर पेशावाईत हे गाव हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत होते.[१]
इ.स. १९७३-७४ साली येथे उत्खनन करण्यात आले. त्यांत पूर्वंसातवाहन, उत्तरसातवाहन आणि सातवाहनोत्तरकालीन भिन्न वस्त्यांचे अवशेष आढळले. या शहराचे प्राचीन नाव भोग्वर्धन आहे असा इतिहासात उल्लेख आढळतो.भोग्वर्धन हे नाव .भोग्वर्धन या राज्यामुळे पडले. या राजामुळे भोकरदन(भोग्वर्धन)या गावाचा व्यापारी गाव म्हणून त्या काळात प्रसिद्ध झाले होते. व युरोपात माल जाई. येथे एक प्रसिद्ध अशी लेणी आहे. जेव्हा अजिंठा व वेरूळ या लेणाचे काम पूर्ण झाले तेव्हा जाताना ही छोटी लेणी व महादेवाचे मंदिर बांधून गेले व या मंदिर व लेण्यांना स्थानिक भाषेत रामेश्वरचे मंदिर असेही म्हणतात.भोकरदन हे शहर अत्यंत निसर्गरम्य शहर आहे. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी व जाईचा देव ह्या ठिकाणी डोंगराळ भाग तसेच जंगल क्षेत्र म्हणून ओळखले जाते.
धार्मिक स्थळे
राजुरचा गणपती
राजूरचे गणेश मंदिर,ता.भोकरदन हे जालना शहरापासून उत्तरेला २५ किमी अंतरावर आहे प्रत्येक चतुर्थीला अनेक भाविक देवतेची प्रार्थना करण्यासाठी येतात. अंगारिका चतुर्थीला मंदिरात मोठ्या प्रमाणात मेळा भरतो.
राजूर हे गणेश पुराणातील गणपतीचे पूर्ण पिठ मानले गेले आहे. इतर पीठ मोरगाव, चिंचवड (पुणे) येथे आहेत. उर्वरित अर्धा पिठ पद्मालय आहे.
मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असून ते पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे.
रामेश्वर-सिद्धेश्वर मंदिर
भोकरदन शहराला लागून असलेल्या आलापुर या गावात हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे.दरवर्षी महाशिवरात्रीला मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
शहराचा वाढता विस्तार
वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच शहरीकरण,सोयीसुविधा उपलब्ध झाल्यामुळे नवे भोकरदन शहर उदयास आले आहे.ज्यात प्रामुख्याने जिजाऊनगर,गणेशनगर,म्हाडा कॉलनी इत्यादी विभाग येतात.भोकरदन शहराचे नूतन तहसील इमारत ,पोलीस अधीक्षक कार्यालय आता जुने भोकरदन (बाजारपट्टी) येथून जिजाऊनगर येथे स्थलांतरित झाले आहे.