Jump to content

भेंड

Starr 010203-0204 Thespesia populnea
Thespesia populnea Leaf

भेंडीचे झाड हे तपकिरी रंगाची खरखरीत साल असलेले मध्यम आकारचे व छत्रीसारख गोल वाढणारे वर्षभर हिरव्या, पिंपळासारख्या पानांनी आच्छादलेला वृक्ष आहे. याला पिवळ्या रंगाची मोठी, शोभेची फुले वर्षभर येतात. ही फुले जसजशी परिपक्व होतात तशी जांभळट, मातकट लाल रंगाची होतात. या फुलांच्या अंश:कोषात पाकळ्यांच्या मुळांशी गडद लाल मखमली रंग असतो. त्या झाडाची फळेही हिरवी गार टणकफळे, फळ फोडल्यावर त्यातून पिवळा रंग निघतो आणि चंदेरी बिया-सोन्या-चांदीचच फळ असे दिसते.[]

मूळचे आशिया आणि आफ्रिका खंडातील असलेले हे झाड कोकण, दक्षिण भारत, श्रीलंका, अंदमान, बांगला देश आणि पॅसेफिक बेटांवर आढळते. मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि कोलंबो येथे या झाडांची लागवड रस्त्याच्या दुतर्फा आढळते. क्षारयुक्त जमिनीतही याची पैदास आणि वाढ जोमाने होते. बियांनी तसेच छाटणी पद्धतीने रोप तयार करून झाडांची पैदास करता येते. याच्या लाकडाचा उपयोग फर्निचर, बैलगाडीची चाके आणि होड्या तयार करण्यासाठी होतो. कागद तयार करण्यासाठीही याचा उपयोग होतो. याच्या साली व फळांपासून लालसर दाट वंगणाचे तेल मिळत. फुलांपासून पिवळा रंग तयार करतात. एरंडयाच्या तेलातला भेंडीच्या बियांचा अर्क कीटकांच्या, प्रामुख्याने डासांच्या चावाण्यावर वर उपाय आहे.

भेंडीची मूळशक्तीवर्धक आहेत. त्वचा विकारांवर हे सर्वण्यात औषध आहे. याचा उपयोग अतिसार मूळव्याध तसेच मधुमेहाच्या उपचारांमध्ये केला जातो.

संदर्भ

  1. ^ Empty citation (सहाय्य)