भूशिर
भूशिर [श १] म्हणजे समुद्रात किंवा सरोवरात घुसलेले जमिनीचे निमुळत्या टोकासारखे दिसणारे भूरूप होय. भूशिराप्रमाणेच द्वीपकल्पाच्याही[श २] ठायी तीन बाजूंस पाण्याने वेढलेले, निमुळते होत जाणारे जमिनीचे भूरूप असते. मात्र अशा भूरूपाचा विस्तार विशाल असला, तरच त्यास द्वीपकल्प ही संज्ञा वापरतात; तर स्थानिक व्याप्तीच्या, छोट्या विस्ताराच्या अशा भूरूपांस भूशिर या संज्ञेने उल्लेखले जाते[१].
आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकास वसलेले केप ऑफ गुड होप हे भूशिर, तसेच जिब्राल्टर सामुद्रधुनीच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील टोकांस असलेली दोन भूशिरे इत्यादी भूशिरे प्रसिद्ध आहेत.
पारिभाषिक शब्दसूची
संदर्भ व नोंदी
- ^ कुलकर्णी, एल.के. भूगोलकोश.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत