भूत जोलोकिया
भूत जोलोकिया | |
---|---|
लाल आणि हिरवी भूत जोलोकिया | |
प्रकार | मिरची |
विपनन नाव | भूत मिरची, विष मिरची, नाग मिरची |
उगम | ईशान्य भारत (खास करून मेघालय, आसाम, मणिपूर आणि नागालँड)[१] |
भूत जोलोकिया किंवा भूत मिरची[२][३] (आसामीमध्ये:भूतान मिरची[४]), ही ईशान्य भारतात लागवड केली जाणारी एक विशिष्ट संकरित मिरचीची जात आहे.[५] [६] ही मिरची कॅप्सिकम चिनेन्स आणि कॅप्सिकम फ्रूटेसेन्सचे या दोन जातीचा संकर करून निर्माण केलेली आहे.[७]
२००७ मध्ये, गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स ने भूत जोलोकिया ला जगातील सर्वात तिखट मिरची असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. ही मिरची तत्कालीन टॅबॅस्को सॉसपेक्षा १७० पट जास्त तिखट ठरली होती. या मिरचीला दहा लाख स्कोव्हिल हीट युनिट्स (SHUs) (१०,०१,३०४ SHU) पेक्षा जास्त रेट दिले जाते. तथापि कालांतराने, सर्वात तिखट मिरची वाढवण्याच्या शर्यतीत, २०११ मध्ये 'त्रिनिदाद स्कॉर्पियन बुच टी मिरची' आणि २०१३ मध्ये 'कॅरोलिना रीपर'ने भूत जोलोकिया मिरचीला मागे टाकले.[८]
व्युत्पत्ती आणि प्रादेशिक नावे
भूत जोलोकिया चा आसामी भाषेत शब्दशः अर्थ 'भूतानची मिरची' असा होतो. यातील भूत हा शब्द 'भूतान' या देशाचे नाव दर्शवतो, परंतु अनवधानाने भूत म्हणजे घोस्ट असा अर्थ गृहीत धरून हिला 'घोस्ट चिली' संबोधल्या जाऊ लागले.[९][१०][११][१२]
आसाममध्ये,[१३] या मिरचीला बिह झोलकिया (বিহ জলকীয়া) म्हणजे 'विष मिरची' म्हणूनही ओळखले जाते. आसामी भाषेत 'बिह' म्हणजे 'विष' आणि 'झोलोकिया' म्हणजे 'मिरची' असा अर्थ होतो. या नावावरून मिरचीची दाहकता लक्षात येते.[१४]
त्याचप्रमाणे, नागालँडमध्ये, या मिरचीला नागा जोलोकिया ('नागा मिरची') आणि भूत जोलोकिया असे म्हणतात.[१४] आसाम आणि मणिपूर सारख्या इतर प्रदेशांमध्ये हे नाव विशेषतः सामान्य आहे.[१४] या उपखंडातील इतर नावे सागा जोलोकिया, इंडियन मिस्ट्री चिली आणि इंडियन रफ चिली अशी देखील आहेत.[१४]
तेजपूर या आसामी शहराच्या नावावर तिला तेजपूर मिरची असे देखील म्हणतात.[१५] मणिपूरमध्ये या मिरचीला उमरोक[१६] किंवा ओ-मोरोक किंवा ट्री चिली असे म्हणतात.
ईशान्य भारतात, या मिरचीला किंग मिरची किंवा किंग कोब्रा मिरची म्हणून देखील ओळखले जाते; ज्यावरून मराठीत हिला राजा मिरची असे म्हणले जाते.[१७][१८]
चित्र दालन
- १० दिवसांची भूत जोलोकिया
- ३० दिवसाची भूत जोलोकिया
- ४० दिवसाची भूत जोलोकिया कोको पावडर मध्ये वाढवलेली
- पीच रंगाची भूत जोलोकिया
- पिवळी भूत जोलोकिया
- चॉकलेटी भूत जोलोकिया
- जांभळी भूत जोलोकिया
- लाल भूत जोलोकिया
- पिकलेले भूत जोलोकिया
संदर्भ
- ^ It is extensively cultivated in northeastern India, especially in the states of Assam, Nagaland and Manipur. https://www.frontalagritech.com/chillies-peppers-herbs
- ^ Gamillo, Elizabeth (3 August 2018). "Ghost peppers are saving U.S. grasslands—by scaring off hungry mice". Science. 25 June 2019 रोजी पाहिले.
- ^ Deepak, Sharanya (1 January 2019). "The Incredible Story of Bhut Jolokia: From Rural India to Dumb YouTube Stunts". Taste. 25 June 2019 रोजी पाहिले.
- ^ "Definition of BHUT JOLOKIA". www.merriam-webster.com (इंग्रजी भाषेत). 2020-10-26 रोजी पाहिले.
- ^ Shaline L. Lopez (2007). "NMSU is home to the world's hottest chile pepper". 19 February 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 February 2007 रोजी पाहिले.
- ^ "'Ghost chile' burns away stomach ills - Diet & Nutrition - NBC News". Associated Press. 2007. 5 August 2007 रोजी पाहिले.
- ^ Paul W. Bosland; Jit B. Baral (2007). "'Bhut Jolokia'—The World's Hottest Known Chile Pepper is a Putative Naturally Occurring Interspecific Hybrid" (PDF). Horticultural Science. 42 (2): 222–4. 23 September 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 11 July 2014 रोजी पाहिले.
- ^ "Hottest Chili". Guinness World Records. 26 December 2013 रोजी पाहिले.
- ^ "Definition of BHUT JOLOKIA". www.merriam-webster.com (इंग्रजी भाषेत). 2020-10-26 रोजी पाहिले.
- ^ "India's 'ghost pepper' is one of the hottest chillies. Can Britain handle it?". 16 September 2021.
- ^ "MasterChef Australia features eight of the hottest chillies on the planet; have you tried any?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-06-02. 2021-11-04 रोजी पाहिले.
- ^ "Can Ghost Peppers Kill You?". HowStuffWorks (इंग्रजी भाषेत). 2015-08-11. 2022-08-17 रोजी पाहिले.
- ^ https://chili-plant.com/chilli-varieties/bhut-jolokia-chili/ "The origin of the Chili lies in the north-eastern of India, in the region of Assam."
- ^ a b c d Raktim Ranjan Bhagowati; et al. (2009). "Genetic Variability and Traditional Practices in Naga King Chili Landraces of Nagaland" (PDF). Asian Agri-History. 13 (3): 171–180. 20 July 2011 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
- ^ Dave DeWitt; Paul W. Bosland (2009). The Complete Chile Pepper Book. Timber Press. p. 158. ISBN 978-0-88192-920-1.
- ^ Sanatombi K.; G. J. Sharma (2008). "Capsaicin Content and Pungency of Different Capsicum spp. Cultivars". Not. Bot. Hort. Agrobot. Cluj. 36 (2): 89–90. ISSN 1842-4309. 23 August 2011 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2 March 2011 रोजी पाहिले.
- ^ "Bhut Jolokia / Naga Chilli / King Chilli". Aug 2021.
- ^ "राजा मिरची : भारतातली सर्वांत तिखट मिरची, जिचा एक घास गडाबडा लोळायला लावतो..." बिबिसी मराठी. २ ऑगस्ट २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित.