Jump to content

भुविज्ञान

भुविज्ञान शास्त्रात धरतीच्या अंतरंगांच्या संबंधित संकल्पनांचा समावेश होतो.

भुविज्ञान धरती अथवा पृथ्वीची अंतरबाह्य संरचना,त्या संरचनेला कारणीभुत ठरलेल्या प्रक्रिया ह्यांची माहिती देते.त्यात विविध प्रकारच्या,विविध ठिकाणच्या खडकाचा इतिहास आणि त्यांचे आयुष्य,वय याबाबत ही माहिती मिळते.ह्यासर्व अभ्यासाच्या आधाराने भुविज्ञान शास्त्रज्ञ पृथ्वीचा इतिहास आणि पृथ्वीचे वय ह्यांबद्दल माहिती मिळवुन शकतात. भुविज्ञानाच्या मदतीने पृथ्वीच्या खंडात्मक रचना, पुर्व वातावरण आणि जिवनाचे पुरावे मिळू शकतात. भुविज्ञान शास्त्रज्ञ विविध संशोधन प्रक्रिया आणि संकल्पनांच्या आधारे पृथ्वीवरील भुरूपे, त्यांची संरचना याबाबद्दल माहिती मिळवू शकतात. ही माहिती खनिज उत्पादन,इमारत बांधणी,धारण परिक्षेत्र नियोजनासाठी उपयुक्त ठरते.त्याच प्रमाणे भूकंपाचे नियोजन करण्यासारही सुद्धा भुविज्ञान महत्त्वाचे ठरते.