Jump to content

भुदरगड तालुका

भुदरगड तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

भुदरगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील तालुका आहे. येथे एक किला आहे, किले भुदरगड जे नाव या तालुकयाला दिले आहे.साधारणतः ९६ ते १०० गावांचा हा तालुका.गारगोटी हे येथील मुख्य ठिकाण. भुदरगड हे फक्त तालुक्याचे नाव आहे, तालुकास्तरीय सर्व काम काज गारगोटी या शहरातून चालते. गारगोटी पासून १० किलोमीटर अंतरावर भुदरगड किल्ला आहे. गारगोटी शहर कोल्हापूर शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. वेदगंगा नदीचा प्रदेश असणारा हा विभाग शेती आणि शैक्षणिक क्षेत्रात पुढे आहे.

क्रांती ज्योत स्मारक

गारगोटीमध्ये 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये शहीद झालेल्या 7 क्रांतिकारीच्या स्मरणार्थ तहसील कार्यालयसमोर एक भव्य अशी देखणी सुरेख क्रांती ज्योत स्मारक आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके
आजरा तालुका | करवीर तालुका | कागल तालुका | गगनबावडा तालुका | गडहिंग्लज तालुका | चंदगड तालुका | पन्हाळा तालुका | भुदरगड तालुका | राधानगरी तालुका | शाहूवाडी तालुका | शिरोळ तालुका | हातकणंगले तालुका