भीम आर्मी
भीम आर्मी किंवा आंबेडकर आर्मी ही भारतातील एक सामाजिक संघटना आहे. 21 जुलै २०१५ रोजी चंद्रशेखर आझाद (रावण) यांनी या संघटनेची स्थापना केली व ते या संघटनेचे अध्यक्ष आहेत. या संघटनेत अनुसूचित जातींच्या तरुणांचा सहभाग असून, ही संघटना उत्तरेकडील सात राज्यांत सक्रियपणे कार्यरत आहे.[१] अनुसूचित जातीच्या लोकांवर (दलितांवर) झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध भीम आर्मी कार्य करते. चंद्रशेखर व भीम आर्मी हे दोघेही आंबेडकरवादी विचारधारा मानणारे आहेत. सहारनपूरमधील जातीय हिंसाचारानंतर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली होती. सहारनपूरच्या भदो गावामध्ये शाळा स्थापन करून अनुसूचित जातीच्या मुलांना निःशुल्क शिक्षण देण्याचा उपक्रम या संघटनेने केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ प्रकाशझोतात आली.[२]
हनुमान दलित असल्याने
योगी आदित्यनाथ यांनी हनुमान हा दलित असल्याचे विधान केल्यानंतर चंद्रशेखर यांनी देशातील दलित बांधवांनी देशातील हनुमान मंदिरांचा ताबा घ्यावा आणि आपल्या समाजाचे बांधव पुजारी म्हणून नियुक्त करावेत असे आवाहन केले होते.[३]
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ "What is the Bhim Army?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-05-18. 2018-11-24 रोजी पाहिले.
- ^ "चलो पुणे! 'भीम आर्मी'ची ३० डिसेंबरला भीमा कोरेगाव संघर्ष महासभा". Loksatta. 2018-11-22. 2018-11-24 रोजी पाहिले.
- ^ https://www.loksatta.com/desh-videsh-news/dalits-should-take-over-all-hanuman-temples-says-bhim-army-chief-chandrashekhar-1799126/